शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

गोव्यातील कोलवा किनारपट्टीवर वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; मुबंईच्या दोन युवतीची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 20:59 IST

मंगळवारी सांयकाळी उशिरा कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमिना कॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उपनिरीक्षक शिवराम गावकर, महिला हवालदार एलिझा फर्नाडीस, पोलीस शिपाई अजय नाईक व विकास कौशिक यांनी ही कारवाई केली. भा. दं. वि. च्या 370 (अ) व वेश्या व्यवसाय प्रतिबंधात्मक कायदा कलम 4,5,6 व 7 अंर्तगत पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे.

मडगाव - गोव्यात पर्यटन मौसमाला सुरुवात झाल्यानंतर किनारपटटीभागात वेश्यव्यवसायानेही आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली असून, मुंबईहून युवती आणून त्यांना गोव्यात वेश्याव्यवसायाला जुंपणाऱ्या दोघांना काल मंगळवारी सांयकाळी राज्यातील दक्षिण गोव्यातील कोलवा पोलिसांनी अटक केली. अनिता रामदास भिसे (वय 45) या महिलेसह पोलिसांनी आझाद हुसेन खान (वय 45) या दलालांच्या मुसक्या आवळल्या. आज या दोघांना न्यायालयात उभे केले असता, त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अनिता या मूळ महाराष्ट्रातील नांदेड जिल्हयातील असून सध्या तिचे वास्तव मुबंईतल्या विरार येथील पालघर भागात होते असे तपासात आढळून आले आहे तर आझाद हा गोव्यातील मडगाव शहरातील मालभाट भागातील रहिवाशी आहे.मंगळवारी सांयकाळी उशिरा कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमिना कॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उपनिरीक्षक शिवराम गावकर, महिला हवालदार एलिझा फर्नाडीस, पोलीस शिपाई अजय नाईक व विकास कौशिक यांनी ही कारवाई केली. भा. दं. वि. च्या 370 (अ) व वेश्या व्यवसाय प्रतिबंधात्मक कायदा कलम 4,5,6 व 7 अंर्तगत पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे.कोलवा किनाऱ्यावरील पार्किंगच्या जागेत पोलिसांनी ही कारवाई करुन संशयितांच्या मुसक्या आवळल्या. मोबाईलच्या माध्यमातून संशयित गिऱ्हाईकांकडे संपर्क साधत होते. नंतर सौदा पक्का झाल्यानंतर  गिऱ्हाईकांना युवती पुरविण्यात येत होते. कोलवा पोलिसांना ही माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsex crimeसेक्स गुन्हा