शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पैसे दे, अन्यथा तुझ्यासह मुलाला मारू; न घेतलेल्या कर्जासाठी महिला वास्तुविशारदाला दिल्लीतून धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 09:12 IST

Crime News : पीडित महिला या कांदिवलीतील नामांकित महाविद्यालयात वास्तुविशारद म्हणून कार्यरत आहे. चारकोप परिसरात पती व मुलासह राहतात.

मुंबई : कोणतेही कर्ज घेतले नसताना कांदिवलीतील महिला वास्तुविशारदाला आणि तिच्या मुलाला जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याची घटना घडली. गेल्या आठवड्यापासून तेरा विविध मोबाइल क्रमांकावरून या धमक्या दिल्या असल्याची तक्रार समता पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आरोपींना लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. पीडित महिला या कांदिवलीतील नामांकित महाविद्यालयात वास्तुविशारद म्हणून कार्यरत आहे. चारकोप परिसरात पती व मुलासह राहतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर, २०२१ रोजी त्यांना तुमच्या भावाने कर्ज घेतले असून त्याला कनेक्ट करून घ्या अशा आशयाचे फोन आले.   त्यानुसार पीडितेने त्यांचे भावाशी बोलणे करून  दिले आणि बहिणीला त्रास न देता माझ्याशी संपर्क साधा अशी विनंती भावाने फोन करणाऱ्यांना केली.प्रत्यक्षात गोरेगावच्या एका खासगी बँकेतून पीडितेच्या भावाने घेतलेले कर्ज हे फेडण्यात आल्याने बँकेला कोणतेही देणे लागत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कोणत्या बँकेच्या कर्जाची मागणी ते करत आहेत याची मेलमार्फत माहितीदेखील भावाने मागितली. जी न देता एका लिंकवर पीडितेने पैसे पाठवावे असे त्यांना धमकावले जात आहे. त्यांनी समतानगर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी हिरे यांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. तसेच पीडितेने कॉलर्सचे फोन क्रमांक ब्लॉक केल्यानंतर त्यांच्या ऑफिसच्या क्रमांकावर फोन येण्यास सुरुवात झाली आहे.     मुख्य म्हणजे पीडितेशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत त्यांना आणि त्यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यास सुरुवात झाल्याने पोलिसांनी आरोपींना शोधत अटक करण्याची विनंती केली आहे. त्यांनी पोलिसांना १३ मोबाइल क्रमांकाची यादी दिली आहे. हे सर्व क्रमांक दिल्लीचे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी