शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ISISच्या संशयित दहशतवाद्याच्या जामीन अर्जावर ६ आठवड्यात निर्णय द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 21:09 IST

विशेष NIA कोर्टाला मुंबई हायकोर्टाने दिले आदेश

ठळक मुद्देरीब मजीद याचा जामीन मिळवण्याचा तिसरा प्रयत्नही काही महिन्यांपूर्वी अपयशी ठरला होता. ६ आठवड्यांत अरीबच्या जामीन अर्जावर नव्याने सुनावणी घेऊन निर्णय देण्याचा आदेश हायकोर्टाने विशेष NIA कोर्टाला दिले आहेत.

मुंबई - ISIS या दहशतवादी संघटनेचा संशयित दहशतवादी अरीब मजीदला जामीन नाकारण्याचा विशेष NIA (राष्ट्रीय तपास यंत्रणा) कोर्टाचा १९ सप्टेंबर २०१९ चा आदेश आज मुंबई हायकोर्टाने रद्द केला आहे. तसेच ६ आठवड्यांत अरीबच्या जामीन अर्जावर नव्याने सुनावणी घेऊन निर्णय देण्याचा आदेश हायकोर्टाने विशेष NIA कोर्टाला दिले आहेत.सीरियामधील 'ISIS' या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेल्याच्या आरोपामुळे कोठडीत असलेला कल्याणमधील संशयित तरुण अरीब मजीद याचा जामीन मिळवण्याचा तिसरा प्रयत्नही काही महिन्यांपूर्वी अपयशी ठरला होता. त्याचा जामीन अर्ज विशेष NIA कोर्टाने पुन्हा एकदा फेटाळला होता.अरीबविरोधात NIA  ने बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (युएपीए) या दहशतवादविरोधी कायद्याखाली २०१४मध्ये गुन्हा नोंदवला.'कथित गुन्हा इराक व सीरियामध्ये म्हणजेच भारतीय हद्दीच्या बाहेर घडला आहे. एनआयए कायद्यात यावर्षी दुरुस्ती झाली असून त्यानंतरच भारताबाहेरच्या गुन्ह्यांप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचा अधिकार एनआयएला देण्यात आला आहे. त्यामुळे २०१४मध्ये आपल्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा एनआयएला अधिकारच नव्हता', असा युक्तिवाद त्याने अर्जात मांडला होता. मात्र, न्या. आर. आर. भोसले यांनी हा युक्तिवाद अमान्य करत त्याचा अर्ज फेटाळून लावला होता.इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेला अरीब हा तीन मित्रांसह २३ मे २०१४ रोजी यात्रेकरूंच्या गटातून इराकमध्ये गेला होता. त्यानंतर तो 'आयएस' या दहशतवादी संघटनेत सामील झाला, असा आरोप आहे. २८ नोव्हेंबर २०१४ रोजी तो तुर्कस्तानहून मुंबईत परतताच त्याला अटक करण्यात आली. तेव्हापासून तो कोठडीतच आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीISISइसिसHigh Courtउच्च न्यायालयNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा