शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

एक कोटी द्या, अन्यथा मुलांचे अपहरण करू ! डॉक्टर दाम्पत्याकडे मागितली खंडणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 08:21 IST

सप्टेंबर-२०२० मध्ये कोरोना उपचारासाठी इटनकर दाम्पत्य मनीष नगरातील डॉ. तुषार पांडे यांच्या रुग्णालयात होते. पांडे दाम्पत्याच्या प्रॅक्टीसवरून त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्याचा अंदाज शीतलला आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एक कोटी रुपये द्या, अन्यथा तुमच्या मुलांचे अपहरण करू, असे पत्र पाठवून डॉक्टर दाम्पत्याला खंडणीसाठी धमकविल्याचा प्रकार पुढे आला आहे. या संवेदनशील प्रकरणाचा बेलतरोडी पोलिसांनी तपास करून पाच दिवसात छडा लावत फॅशन डिझायनर शीतल इटनकर (४५, शिल्पा सोसायटी) हिला अटक केली आहे.

शीतलचा पती एका शासकीय विभागात अभियंता पदावर कार्यरत आहे. त्याला दीड लाख रुपये वेतन मिळते. त्यांनी ५० लाख रुपयांचे कर्ज घेऊन घर बांधले. त्याचा मासिक ६० हजाराचा बॅंकेचा हप्ता जातो. उर्वारित पैशात घरखर्च भागत नाही. यामुळे फॅशन डिझायनर असलेल्या शीतलला बुटिक सुरू करायचे होते. पतीने पैसे न दिल्याने नात्यात दुरावा निर्माण झाला होता. सप्टेंबर-२०२० मध्ये कोरोना उपचारासाठी इटनकर दाम्पत्य मनीष नगरातील डॉ. तुषार पांडे यांच्या रुग्णालयात होते. डॉ. पांडे यांच्या पत्नीदेखील चिकित्सक आहेत. पांडे दाम्पत्याच्या प्रॅक्टीसवरून त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्याचा अंदाज शीतलला आला होता. त्यांना दोन मुले असल्याचे फेसबूक अकाऊंटवरून तिने शोधले होते. त्या मुलांचे अपहरण करून रक्कम उकळण्याची योजना तिने आखली.

१० जूनला कुरिअरच्या माध्यमातून धमकीपत्र पाठविले. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता ते डॉ. पांडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतलीअति महत्वाकांक्षा ठरली घातकपतीच्या वेतनातून मुलींचे शिक्षण आणि घरखर्च सहज करता आला असता. मात्र स्वत:चे बुटिक सुरू करून शीतल बिझनेस वूमन होऊ इच्छित होती. या अतिमहत्वाकांक्षेपोटी तिने गुन्ह्याचा अविचारी मार्ग स्वीकारला. 

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसdoctorडॉक्टर