शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"५ कोटी द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करतो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 18:54 IST

Crime News: गेल्यावषी ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येबाबत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांना ईमेल आला होता. ज्यात पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याची धमकी दिली होती. या ईमेलनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यात आल्या होत्या.

पाँडिचेरीमध्ये मोठी खळबळ उडाली होती.  एका 43 वर्षांच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्य़ाचा प्रस्ताव दिला होता. जर त्याला कोणी 5 कोटी रुपये देत असेल तर तो मोदींची हत्या करेल, असा प्रस्ताव त्याने पोस्ट केला. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. (Facebook Post of murder of PM Narendra modi)

आर्यनकुप्पम गावातील रहिवासी असलेल्या या व्यक्तीला गुरुवारी अटक करण्यात आली. नंतर त्याला स्थानिक न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविले. 

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी रिअल इस्टेट एजंट आहे. त्याचे नाव सत्यानंदम आहे. त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यानंदमने त्याच्या फेसबुक वॉलवर एक मेसेज लिहिला होता. गुरुवारी हा मेसेज एका कार चालकाने पाहिला आणि पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही धमकी पाहिल्याने कार चालकाने लगेचच पोलिसांना याची माहिती दिली. 

गेल्यावषी ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येबाबत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांना ईमेल आला होता. ज्यात पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याची धमकी दिली होती. या ईमेलनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यात आल्या होत्या. NIA ला मिळालेल्या या ईमेलमध्ये केवळ Kill Narendra Modi या ३ शब्दांचा वापर करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. हा ईमेल ८ ऑगस्ट रोजी मिळाला होता. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेला धोका असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. या ईमेलनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुरक्षा आणखी कडक आणि वाढवण्यात आली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMurderखूनFacebookफेसबुक