शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दुकानातून चक्क मुलीला पळवण्याचा डाव असा फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 17:15 IST

चीन : दुकानात कोणी नसल्याचा फायदा घेत एकाने थेट दुकानमालकाच्या मुलीचेच अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र बाहेर असलेल्या एका जागरुक इसमामुळे हा अपहरणाचा डाव उधळला गेला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.हा प्रकार घडला चीनच्या डोनगान शहरातील दलांग या ठिकाणी. अपहरणाचा डाव दुकानातील सीसीटीव्ही  कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एका दुकानात एक ...

ठळक मुद्देकोणी नसल्याचा फायदा घेत थेट दुकानमालकाच्या मुलीचेच अपहरण करण्याचा प्रयत्न केला. हा अपहरणाचा फसलेला डाव दुकानातील सीसीटीव्ही  कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

चीन : दुकानात कोणी नसल्याचा फायदा घेत एकाने थेट दुकानमालकाच्या मुलीचेच अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र बाहेर असलेल्या एका जागरुक इसमामुळे हा अपहरणाचा डाव उधळला गेला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

हा प्रकार घडला चीनच्या डोनगान शहरातील दलांग या ठिकाणी. अपहरणाचा डाव दुकानातील सीसीटीव्ही  कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एका दुकानात एक लहान मुलगी स्टुलावर चढून काहीतरी काम करण्यात व्यस्त होती. मागच्या बाजूला असलेल्या दरवाज्यातून एका इसमाने आतमध्ये डोकावून पाहिलं. आतमध्ये कोणी नाही ना याची शहानिशा केली. दुकानाच्या आत आल्यावरही त्याने चौफेर पाहत दुकानात आणखी कोणी नसल्याची खात्री करून घेतली. दुकानात या मुलीव्यतिरिक्त आणखी कोणी नसल्याची खात्री पटल्यावर त्याने त्या मुलीला मागच्या बाजूने धरलं आणि बाहेर घेऊन गेला. ती मुलगी फार रडायला लागली. हे काय घडतंय याची त्या चिमुकलीला कल्पनाच येत नव्हती. त्यामुळे तिने टाहो फोडला. तिच्या रडण्याचा आवाज बाहेर उभ्या असलेल्या एका इसमाला एकू गेल्याने त्याने त्या इसमाला पकडलं आणि मुलीला त्याच्या तावडीतून सोडवलं. 

व्हिडीयो पाहण्यासाठी क्लिक करा 

पोलिसांनी त्याला अटक केली असून ह्युयांग असं त्या आरोपीचं आडनाव असल्याचं समोर येतंय. त्याची चौकशी सुरू असून तो त्यावेळी दारुच्या नशेत असल्याचंही समोर आलंय. तसच त्यादिवशी काय काय घडलं याबाबत त्याला काहीच आठवत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. सुदैवाने त्या चिमुकलीला कसलीच दुखापत झाली नसून ती सुखरुप आहे, बाकी या आरोपीने असं का केलं याबाबत पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येतंय.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयchinaचीनCrimeगुन्हा