शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी त्यांनी थेट डिलिव्हरी बॉयलाच लुटले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 14:37 IST

डिलिव्हरी बॉयकडून अनेक महागड्या गोष्टी आरोपींनी लुटल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देआरोपींनी आपल्या अनुभवाचा फायदा घेत डिलिव्हरी बॉयला लुटण्याचा कट रचला. शशांक अग्रवाल (३२) आणि अमर सिंह (२९) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एका आरोपींने आपल्या जबाबात आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी तिला आयफोन -११ गिफ्ट द्यायचं होतं असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी बॉयफ्रेंड काय काय करू शकतात. गर्लफ्रेंडला महागडं गिफ्ट देण्यासाठी दोन मुलांनी धक्कादायक गोष्ट केली आहे. गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी दोन तरुणांनी चक्क डिलीव्हरी बॉयला लुटल्याची घटना नवी दिल्लीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. या दोन्ही आरोपींनी एका ऑनलाइन शॉपिंग पोर्टलच्या डिलिव्हरी बॉयला कट रचून लुटलं आहे. डिलिव्हरी बॉयकडून अनेक महागड्या गोष्टी आरोपींनी लुटल्याचे उघडकीस आले आहे. शशांक अग्रवाल (३२) आणि अमर सिंह (२९) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.या दोन अटक आरोपींनी आपापल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी डिलिव्हरी बॉयला लुटण्याचा कट रचला होता. यापैकी एका आरोपींने आपल्या जबाबात आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी तिला आयफोन -११ गिफ्ट द्यायचं होतं असं म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली असली तरीही तिसरा आरोपी मात्र फरार आहे. मात्र, पोलीस सध्या त्याचाही कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपींकडून डिलिव्हरी बॉयकडून हिसकावलेली पार्सल बॅग देखील पोलिसांनी जप्त केली आहे.  

या दोन्ही आरोपींची ओळख पटली असून पोलिसांनी दोघांनाही अटक करण्यात आलं आहे. आरोपी शशांक अग्रवाल हा दिल्लीतील शास्त्री नगर येथे राहणारा असून आरोपी अमर सिंह हा देखील दिल्लीतील शकुरबस्ती येथे राहणारा आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या महितीनुसार, गुरुवारी एक डिलिव्हरी बॉय पंजाबी बाग येथे सामानाची बॅग घेऊन पार्सल ऑर्डर डिलिव्हरीसाठी आला होता. त्याचवेळी अचानक तीनजण तिथे आले आणि अचानक त्यांनी डिलिव्हरी बॉयच्या हातातून पार्सल खेचून पळ काढला. या पार्सलमध्ये मोबाइल फोनसारखे इतरही काही महागड्या गिफ्टच्या वस्तू होत्या. याप्रकरणाची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास करुन अग्रवाल आणि सिंह यांच्या मुसक्या आवळल्या. हे दोघेही एका ऑनलाइन ई-शॉपिंग पोर्टलसाठी डिलिव्हरी बॉयचं काम करत होते. त्यामुळे त्यांना आरोपी असलेल्या दोघांना देखील डिलिव्हरी बॉयजवळ दिवाळीच्या तोंडावर महागड्या गिफ्ट वस्तू असतात हे माहित होतं. या आरोपींना वस्तू डिलिव्हरीची प्रक्रिया ही अतिशय योग्यरितीने माहिती असते. आरोपींनी आपल्या अनुभवाचा फायदा घेत डिलिव्हरी बॉयला लुटण्याचा कट रचला.

टॅग्स :ArrestअटकRobberyचोरीMobileमोबाइलPoliceपोलिसdelhiदिल्ली