शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"आताच माझ्याशी लग्न कर"; 2 मुलांचा बाप असलेल्या प्रियकराच्या घरासमोर प्रेयसीचा हायव्होल्टेज ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 13:09 IST

एका महिलेचे एका विवाहित पुरुषाशी प्रेमसंबंध होते. मात्र, हे सर्व लग्नापर्यंत पोहोचल्यानंतर प्रियकराने तिला नकार दिला. यानंतर संतापलेल्या महिलेने प्रियकराच्या घरासमोरच ठाण मांडले. 

नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. प्रेमाचे अनेक भन्नाट किस्से हे सतत समोर येत असतात. अशीच एक अजब घटना समोर आली आहे. एक महिला विवाहित व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि पुढे जे काही घडलं ते वाचून धक्काच बसेल. एका महिलेचे एका विवाहित पुरुषाशी प्रेमसंबंध होते. मात्र, हे सर्व लग्नापर्यंत पोहोचल्यानंतर प्रियकराने तिला नकार दिला. यानंतर संतापलेल्या महिलेने प्रियकराच्या घरासमोरच ठाण मांडले. 

"आताच माझ्याशी लग्न कर" असं म्हणत 2 मुलांचा बाप असलेल्या प्रियकराच्या घरासमोर प्रेयसीचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. महिला आणि तिचा प्रियकर यांची या महिलेच्या बहिणीच्या घरी ओळख झाली. यानंतर ते दोघे प्रेमात पडले. प्रियकराने प्रेमाचं आणि लग्नाचं आश्वासन देत आपल्याशी 6 महिने संबंध ठेवल्याचा आरोप या प्रेयसीने केला आहे. याबद्दलची तक्रार तिने पोलिसात दिली असून प्रियकराने आपल्याला फसवल्याचं म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील बेतियामध्ये ही घटना घडली आहे. 'मी लॉरिया पोलीस ठाण्यात प्रियकराच्या विरोधात अर्ज केला आहे. तो माझ्याशी लग्न करेपर्यंत मी हे घर सोडणार नाही' असंही तिने म्हटलं आहे. प्रेयसीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, प्रियकर आधीच विवाहित होता. दोघेही प्रेमात पडल्यानंतर प्रियकराने महिलेचा फोटो काढून तिला प्रेमाचं आश्वासन दिलं. यानंतर प्रियकराने आपल्या फोटोसोबत छेडछाड करून त्याच्याशी स्वतःचा फोटो जोडला आणि अश्लील फोटो तयार केला. 

तो फोटो आपल्या पतीला नेऊन दाखवला, असा आरोप महिलेने केला आहे. प्रियकराने तिच्या पतीला त्यांच्यातील प्रेमसंबंधांविषयी सांगितल्यामुळे पतीने आपल्याला घरातून हाकलून दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. यानंतर संतापलेल्या महिलेनं प्रियकराचं घर गाठलं आणि तिथे तळ ठोकला. लग्न करण्याचं आश्वासन देऊन त्याने तिच्याशी संबंध ठेवले, असं तिचं म्हणणं आहे. महिलेचा प्रियकर विवाहित असून तो दोन मुलांचा बाप आहे, असं सांगितलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी