शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

Girlfriend Killed Boyfriend: गर्लफ्रेंडने रागाच्या भरात घेतला प्रियकराचा जीव, नंतर स्वत:ला वाचवण्यासाठी केला वेगळाच 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 17:20 IST

पोलिसांची दिशाभूल करण्याचं तिचं 'प्लॅनिंग' फसलं कारण...

Girlfriend killed her Live-in partner boyfriend: हल्ली लिव्ह इन रिलेशनशिपचा ट्रेंड झपाट्याने वाढताना दिसतोय. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जोडीदार लग्नाशिवाय जरी एकत्र राहत असले तरी त्यांच्यात नवरा-बायको प्रमाणेच वाद किंवा भांडणं होणं स्वाभाविक आहे. पण गाजियाबाजदमध्ये एक खळबळजनक घटना घडली. लिव्ह इन मध्ये राहत असलेल्या एका महिलेने भांडणादरम्या आपल्या जोडीदाराचा चक्क जीवच घेतला. यात आश्चर्याची गोष्ट अशी की, एका अतिशय क्षुल्लक कारणावरून हे भांडण वाढलं आणि त्यातून त्या महिलेने आपल्या जोडीदाराला ठार मारलं. त्यानंतर, पोलिसांपासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी त्या महिलेने असा काही प्लॅन रचला की ज्याचा कोणालाच अंदाज येऊ शकला नसता. पण अखेर त्या जोडीदाराचा मृतदेह सापडल्यानंतर त्या महिलेलाही अटक करण्यात आली.

 गाजियाबादच्या थाना टीला चौकात शनिवारी रात्री पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन गस्त घातल होती. त्यावेळी पोलिसांना एक महिला अतिशय अवजड बॅग खेचत नेताना दिसली. बॅग खेचणाऱ्या महिलेला पोलिसांची गाडी दिसल्यानंतर महिला गोंधळली आणि ती रस्त्याच्या अजून कडेला जाऊ लागली. महिलेच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. त्यामुळे महिलेला थांबवून पोलिसांनी जेव्हा बॅग तपासली तेव्हा बॅग उघडल्यावर पोलिसांना धक्काच बसला. कारण त्यात एका पुरूषाचा मृतदेह होता.

कहानी में ट्विस्ट...

महिलेची सखोल चौकशी केल्यानंतर, तिचं नाव प्रिती शर्मा असल्याचं स्पष्ट झालं. तिने तिच्या पतीचे नाव दीपक यादव असल्याचं सांगितलं. हे दोघे गाजियाबादच्या तुलसी निकेतन परिसरात राहणारे होते.  पण महिलेला बॅगेतील मृतदेहाबाबत विचारल्यावर तिने सांगितलं की तो मृतदेह तिच्या लिव्ह इन पार्टनर फिरोजचा आहे. फिरोज हा संभल चा रहिवासी होता. महिला आपल्या पतीपासून वेगळी होऊन ३-४ वर्षांपासून फिरोजसोबत लिव्ह इन मध्ये राहत होती. ६ ऑगस्टच्या रात्री या दोघांमध्ये लग्नाच्या विषयावरून बराच वाद झाला. रागाच्या भरात फिरोज प्रितीला म्हणाला की, "तू तर चालू बाई आहेस, तू स्वत:च्या पतिशी प्रामाणिक राहू शकली नाहीस, माझ्यासोबत कशी काय नीट वागशील..." अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या जोडीदाराच्या तोंडून ऐकल्यानंतर प्रिती प्रचंड संतापली आणि रागाच्या आवेशात तिने थेट जोडीदारा जीव घेतला.

रात्रीच्या वेळी तिने रागाच्या भरात त्याच्या गळा कापला. त्यानंतर त्याचा मृतदेह लपवण्यासाठी तिने सकाळी मोठी ट्रॉली बॅग विकत आणली. त्यात फिरोजचा मृतदेह भरून ती बॅग एखाद्या ट्रेनमध्ये ठेवण्यासाठी घेऊन जात असतानाच तिला पोलिसांच्या गाडीने अडवल्यामुळे हा सारा उलगडा झाला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस