दारूच्या नशेत शरीरसंबंध ठेवताना १० सेकंद महागात पडली, प्रेयसीचा मृत्यू, प्रियकराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 04:29 PM2021-10-01T16:29:45+5:302021-10-01T16:32:28+5:30

सैम पायबसने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात डार्लिंगटनमध्ये २४ बॉटल बिअर प्यायली होती

Girlfriend choked by boyfriend to death during sex and was jailed for 5 years | दारूच्या नशेत शरीरसंबंध ठेवताना १० सेकंद महागात पडली, प्रेयसीचा मृत्यू, प्रियकराला अटक

दारूच्या नशेत शरीरसंबंध ठेवताना १० सेकंद महागात पडली, प्रेयसीचा मृत्यू, प्रियकराला अटक

Next
ठळक मुद्देअटॉर्नी जनरल यांनी या प्रकरणात पुन्हा कोर्टात अपील करत शिक्षा वाढवावी अशी मागणी केली आहे.हत्या प्रकरणात टेसाइड क्राऊन कोर्टाने मागील महिन्यात ४ वर्ष ८ महिन्याची शिक्षा सुनावली. सैम पायबसनं तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, मी खूप नशेत होतो त्यामुळे त्यादिवशी काय घडलं त्याबद्दल खूप कमी आठवतंय.

लंडन – इंग्लंडच्या डार्लिंगटनमध्ये हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी दारुच्या नशेत गर्लफ्रेंडसोबत शारिरीक संबंध बनवताना प्रेयसीचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली. या प्रकरणी टेसाइड क्राउन कोर्टाने दोषी प्रियकराला ५ वर्षाची शिक्षा सुनावली परंतु ही शिक्षा कमी असल्याचं सांगत अटॉर्नी जनरल यांनी शिक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.

डार्लिंगटनमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय सॅम पायबसला(Sam Pybus) त्याची गर्लफ्रेंड सोफी मॉस(Sophie Moss) हत्या प्रकरणात टेसाइड क्राऊन कोर्टाने मागील महिन्यात ४ वर्ष ८ महिन्याची शिक्षा सुनावली. पायबसचं या आधीच लग्न झालं होतं तर ३३ वर्षीय सोफीही दोन मुलांची आई होती. अटॉर्नी जनरलनं या प्रकरणात आरोपी प्रियकराला मिळालेली शिक्षा कमी असल्याचं सांगत कोर्टात ही शिक्षा वाढवण्यासाठी अपील केले. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, अटॉर्नी जनरल यांनी या प्रकरणात पुन्हा कोर्टात अपील करत शिक्षा वाढवावी अशी मागणी केली आहे.

२४ बॉटल बिअर प्यायल्यानंतर बनवत होता संबंध

टेसाइड क्राऊन कोर्टाने सुनावणीवेळी सांगितले की, सैम पायबसने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात डार्लिंगटनमध्ये २४ बॉटल बिअर प्यायली होती. त्यानंतर सोफी मॉससोबत तो त्याच्या फ्लॅटवर शारिरीक संबंध ठेवत होता. त्यावेळी दहा सेकंद अथवा त्याहून अधिक वेळ प्रेयसीच्या गळ्यावर त्याने दबाव टाकला होता. ज्यात प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. परंतु सैम पायबसनं तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, मी खूप नशेत होतो त्यामुळे त्यादिवशी काय घडलं त्याबद्दल खूप कमी आठवतंय. जेव्हा दुसऱ्या दिवशी मला जाग आली तेव्हा सोफी नग्न अवस्थेत होती आणि ती काहीही हालचाल करत नव्हती.

रिपोर्टनुसार, पायबसने मदतीसाठी इमरजेन्सी नंबर ९९९ वर कॉल केला. डार्लिंगटन पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण करण्यापूर्वी मी १५ मिनिटं माझ्या कारमध्ये बसून पुढे काय करायचं याचा विचार करत होतो असं त्याने सांगितले. सोफी मॉसचा मृत्यू गळा दाबल्यानेच झाला असल्याचं पोस्टमोर्टम रिपोर्टमधून खुलासा झाला. पॅथोलॉजिस्टनं सांगितलं की, मृत्यू खूप वेळ गळा दाबल्याने झाला आहे. सोफीच्या शरीरावर कुठेही हिंसा किंवा मारहाण झाल्याच्या खूणा आढळल्या नाहीत.

शिक्षा वाढवण्यावर कोर्ट घेणार निर्णय

आता या प्रकरणात कोर्टाने सैम पायबसची शिक्षा वाढवायची की नाही याचा निर्णय घ्यायचा आहे. जस्टीस पॉल वॉटसन क्यूसी यांनी मागच्या महिन्यात पायबसला ४ वर्ष ८ महिने जेलची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर महिला अधिकार कार्यकर्त्याने या शिक्षेवर आक्षेप घेत एका महिलेचा गळा दाबून हत्या करणं दुर्दैवी आहे. हा भयानक प्रकार असल्यानं शिक्षा वाढवावी अशी मागणी केली आहे.

Web Title: Girlfriend choked by boyfriend to death during sex and was jailed for 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.