शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीनं केलेल्या ऍसिड हल्ल्यात प्रियकराचा मृत्यू; दुसरीकडे लग्न ठरल्यानं प्रेयसीचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 22:07 IST

प्रियकराचं लग्न दुसऱ्या तरुणीसोबत ठरल्यानं प्रेयसीचा संताप; ऍसिड हल्ल्यात स्वत:देखील भाजली

आग्रा: प्रेयसीनं केलेल्या ऍसिड हल्ल्यात प्रियकराचा मृत्यू झाल्याची घटना आग्र्यात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर रात्री त्याच्या प्रेयसीकडे थांबला होता. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. यानंतर सकाळी ऍसिड हल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यात प्रियकराचा मृत्यू झाला. तर प्रेयसीला इजा झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी प्रेयसीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.८ वर्षाच्या मुलीचं केलं अपहरण; लैंगिक शोषण करून हत्येनंतर विहिरीत फेकला मृतदेह गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. कासगंजच्या सहावरचा रहिवासी असलेला तरुण देवेंद्र राजपूतवर त्याच्या प्रेयसीनं ऍसिड हल्ला केला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान दुपारी त्याचा मृत्यू झाला. देवेंद्र आग्र्यातल्या एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये नोकरीला होता. देवेंद्रनं आपल्यावर ऍसिड फेकल्याचा आरोप त्याची प्रेयसी सोनम पांडेनं केला. सोनम औरैयाच्या भागपूरची रहिवासी आहे. ती एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. शास्त्री नगरमधल्या एका घरात ती भाड्यानं राहते.वीज कंपनीच्या अभियंत्यास आमदारांनी दोरीने बांधले; आमदार मंगेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यातदेवेंद्र रात्री सोनमच्या घरात थांबल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली. त्यांच्यात रात्री उशिरा भांडण झालं. त्यानंतर सकाळी ऍसिड हल्ल्याची घटना घडली. माझ्यावर ऍसिड टाकण्यात आलं, अशी माहिती सोनमनं पोलिसांना दिली. पण सर्वाधिक ऍसिड देवेंद्रच्या अंगावर आढळून आलं. त्यामुळे त्याला गंभीर इजा झाली. देवेंद्रचं लग्न दुसऱ्या मुलीशी ठरल्यानं सोनम नाराज होती, अशी माहिती पोलीस तपासातून पुढे आली.घरमालक सुरेश चंद यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सोनम आधी शास्त्री नगरमध्येच असलेल्या एका दुसऱ्या घरात भाड्यानं राहायची. त्यामुळे ते तिला ओळखतात. ती पाच महिन्यांपासून चंद यांच्या घरात भाड्यानं वास्तव्यात आहे. चंद राहत असलेल्या घरात सोनम पहिल्या मजल्यावर राहते. देवेंद्र आपला पती असल्याचं तिनं चंद यांनी सांगितलं. देवेंद्र महिन्यातले १० दिवस सोनमसोबत राहायचा.