लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वडिलाच्या आठवणीने अस्वस्थ झालेलेल्या एका शाळकरी मुलीने वडिलानंतर पाच महिन्यांनी स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली. साक्षी शशिकांत चोखांद्रे (वय १५) असे तिचे नाव आहे. ती कपिलनगरातील कडू ले-आऊटमध्ये राहत होती.साक्षीला आई आणि एक मोठी बहीण आहे. तिचे वडील शशिकांत चोखांद्रे यांनी पाच महिन्यापूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. तेव्हापासून साक्षी अस्वस्थ राहायची. ती नेहमी वडिलांची आठवण काढत होती. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी आई आणि बहीण कामनिमित्त घराबाहेर गेल्या. ती नववीत शिकत होती. सायंकाळी शाळेतून परतल्यानंतर साक्षीने घराचे दार आतून बंद केले आणि ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी ६ च्या सुमारास घरची मंडळी परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अबिनल बंडू बनकर (वय ३८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर ठाण्यातील हवालदार तोताराम सांबारे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.नेहरूनगर सक्करदरा येथील अॅड. सुनील काळे यांच्या घरासमोर राहणारा अमित सुनील पेंदोर (वय ३०) याने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी रात्री ११.१० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पूजा अमित पेंदोर (वय ३०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.तिसरी घटना जय महाकालीनगर हुडकेश्वर मधील मानेवाडा मार्गावर घडली. अविनाश अशोक जाधव (वय ३३) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास घरच्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी नातेवाईक आणि शेजाऱ्यांना कळविले. उर्मिला अविनाश जाधव (वय २८) यांनी हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
वडिलांच्या आठवणीने अस्वस्थ झालेल्या मुलीने लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:28 IST
वडिलाच्या आठवणीने अस्वस्थ झालेलेल्या एका शाळकरी मुलीने वडिलानंतर पाच महिन्यांनी स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली.
वडिलांच्या आठवणीने अस्वस्थ झालेल्या मुलीने लावला गळफास
ठळक मुद्देनागपूरच्या कपिलनगरातील घटना : सक्करदरा आणि मानेवाड्यातही दोघांनी केली आत्महत्या