शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तरूणीने होणाऱ्या पतीला बोलवलं, म्हणाली - डोळे बंद कर सरप्राइज देते अन् त्याच्यावर चाकूने केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 13:07 IST

(Andhra Pradesh Crime News : भेटीदरम्यान तरूणीने तरूणाला सरप्राइज देते सांगून डोळे बंद करण्यास सांगितलं आणि चाकूने त्याच्या गळ्यावर वार केला.

आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) विशाखापट्टनममधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या हत्येचा प्रयत्न केला. आई-वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी एक मुलगा निवडला होता, जो तरूणीला पसंत नव्हता. मग तिने तरूणाला भेटायला बोलवलं. भेटीदरम्यान तरूणीने तरूणाला सरप्राइज देते सांगून डोळे बंद करण्यास सांगितलं आणि चाकूने त्याच्या गळ्यावर वार केला. ज्यात तो गंभीरपणे जखमी झाला. हॉस्पिटलमध्ये तो मृत्यू आणि जीवनाशी लढत आहे.

ही घटना विशाखापट्टनमच्या चोडावरममध्ये घडली. पोलिसांनी सांगितलं की, जखमी रामू नायडू आणि पुष्पाचं पुढील महिन्यात लग्न होणार होतं. २२ वर्षीय पुष्पाने शाळा सोडली होती. तर रामू नायडू हैद्राबादच्या मध्ये मोठ्या पदावर नोकरीवर आहे. रामूला पुष्पासोबत लग्नासाठी तिच्या आई-वडिलांनी निवडलं होतं. दोघांचा साखरपुडा झाला होता आणि २० मे रोजी दोघांचं लग्न होणार होतं. पण पुष्पाला हे लग्न करायचं नव्हतं. तिने या लग्नासाठी आई-वडिलांना नकारही दिला होता. पण कुटुंबिय तिच्यावर दबाव टाकत होते.

रामू नायडू सोमवारी होणारी पत्नी पुष्पाला भेटायला अनकापल्लीला आला होता. इथे त्यांनी आधी शॉपिंग केली मग साई बाबा आश्रमाच्या डोंगरावर गेले. यानंतर तरूणीने होणाऱ्या नवऱ्याला सरप्राइज देणार म्हणून डोळे बंद करण्यास सांगितलं आणि तिने त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानंतर पुष्पाने त्याच्या गळ्यावर चाकूने वार केला. ज्यात तो गंभीर जखमी झाला. हे प्रकरण समोर आल्यावर तरूणीने रामू जखमी झाल्याची खोटी कहाणी पोलिसांना सांगितली. तिने सांगितलं की, तो बाइकवरून पडला. पण नंतर रामूने पोलिसांना पूर्ण घटनेची माहिती दिली.

महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिला नायडूसोबत लग्न करायचं नव्हतं. हा मुलगा तिच्या आई-वडिलांनी पसंत केला होता. ती म्हणाला की, तिने या लग्नाला विरोध केला होता. पण तिचे आई-वडील काहीही ऐकायला तयार नव्हते. मग तिने बाजारातून चाकू विकत घेतला आणि रामूवर जीवघेणा हल्ला केला. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशCrime Newsगुन्हेगारी