उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे पोटच्या मुलीने आपल्या आईला मृत घोषित केले आणि सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर घेतली, तिला पोलिसांनी शनिवारी अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी कॅम्पियरगंज येथील रहिवासी असलेल्या धनपतीची फसवणूक करून तिचीच मुलगी मुन्नीने दोन वर्षांपूर्वी आईची मालमत्ता स्वतःच्या नावावर केली होती. जमिनीच्या कामावरून जेव्हा धनपतीच्या मुलाने चौकशी केली, तेव्हा मुन्नीने तिच्या नावावर संपत्ती केली असल्याचे समजले. तेही आईचा मृत्यू झाला असल्याचे दाखवून ही आश्चर्याची गोष्ट आहे.यानंतर कुटुंबियांनी तपास केला आणि त्यानंतर कॅम्पियरगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. फसवणूकीचा आणि बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता आणि तिचा शोध घेत होते. दरम्यान, शनिवारी प्राथमिक विद्यालय सिमरिया जवळ ती असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. या माहितीवरून पोलीस निरीक्षक महिला शिपायासह घटनास्थळी पोहोचले आणि आरोपी महिलेला अटक केली.
जिवंत आईस मृत सांगून मुलीने सर्व मालमत्ता केली हडप; पोलिसांनी केली अशी अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 17:43 IST
Crime News : पोटच्या मुलीने आपल्या आईला मृत घोषित केले आणि सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर घेतली, तिला पोलिसांनी शनिवारी अटक केली.
जिवंत आईस मृत सांगून मुलीने सर्व मालमत्ता केली हडप; पोलिसांनी केली अशी अटक
ठळक मुद्देजमिनीच्या कामावरून जेव्हा धनपतीच्या मुलाने चौकशी केली, तेव्हा मुन्नीने तिच्या नावावर संपत्ती केली असल्याचे समजले. तेही आईचा मृत्यू झाला असल्याचे दाखवून ही आश्चर्याची गोष्ट आहे.