पैशाच्या वादातून मैत्रिणींनेच केली चाकूने भोसकून मैत्रिणीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 04:18 PM2019-11-25T16:18:55+5:302019-11-25T16:21:55+5:30

पैसे आणि स्कुटीवरून दोघींमध्ये वाद

Girl murdered girl friend by knife through money dispute | पैशाच्या वादातून मैत्रिणींनेच केली चाकूने भोसकून मैत्रिणीची हत्या

पैशाच्या वादातून मैत्रिणींनेच केली चाकूने भोसकून मैत्रिणीची हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देआलंतमश कॉलोनी भागात रात्री १०.३० वाजेची घटना

औरंगाबाद :  सोने विकून उसने दिलेल्या पैशाच्या वादातून  विवाहित  मैत्रिणीची मैत्रीनीने चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास सेंट्रल नाका परिसरातील आलंतमश कॉलनी येथे घडली. विद्या चंद्रकांत तळेकर (वय-29, ऱा . कचिवाडा, चेलीपुरा) असे मृत महिलेचे नाव आहे. तर शकीला उर्फ निलोफर शेख बाबू  (रा. अल्तमश कॉलनी , सेंट्रल नाका) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, विद्याने लग्नात मिळालेले सोन्याचे दागिने गहाण ठेवून आलेली रक्कम मैत्रीण शकीलाला उसनी दिली होती  शिवाय विद्याची जुनी स्कुटी निलोफर उर्फ शकिला वापरत होती .  गेले काही दिवस सतत मागणी करूनही शकिला पैसे परत करत नव्हती . बुधवारी रात्री स्कुटी परत आणण्यासाठी विद्या ही शकीलाच्या घरी सेंट्रल नाका भागात गेली होती.त्यावेळी उसने पैसे आणि स्कुटी नेण्यावरुन दोघींमध्ये वाद झाला. प्रकरण शिविगाळ आणि मारामारीपर्यंत गेले. 

यावेळी निलोफर उर्फ शकीलाने घरातील धारदार चाकू  विद्या च्या पोटात छातीत आणि मांडीवर भोसकले. यामुळे रक्ताच्या थारोळ्यात विद्या जमिनीवर कोसळली. यात तिचा जागीच  मृत्यू झाला. यानंतर शकीलाने विद्याच्या भावाला कॉल करून त्यांच्यात भांड्ण झाले असून विद्याला घेवून जा असे सांगितले  .भाउ आणि अन्य नातेवाईक यांनी विद्याला  एमजीएम  रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.  यावेळी संतप्त नातेवाईकांनी शकीलाला बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शकीलाला अटक केली. मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन निलोफर  विरोधात हत्येचा गुन्हा जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Girl murdered girl friend by knife through money dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.