शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

Crime News: दिल्लीत मुलीची हत्या, मथुरेत फेकला मृतदेह, असा झाला लाल ट्रॉली बॅगेतील मृतदेहाच्या रहस्याचा उलगडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 10:43 IST

Crime News: उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्हातील यमुना एक्स्प्रेस वेवरील सर्व्हिस रोडवर लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये सापडलेल्या मृतदेहाच्या रहस्याचा अखेर उलगडा झाला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्हातील यमुना एक्स्प्रेस वेवरील सर्व्हिस रोडवर लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये सापडलेल्या मृतदेहाच्या रहस्याचा अखेर उलगडा झाला आहे. हा मृतदेह दिल्लीतील आयुषी यादव या तरुणीचा असल्याचे समोर आले आहे. मृत तरुणीच्या आई आणि भावाने मृतदेहाची ओळख पटवली. पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार आयुषीची हत्या ऑनर किलिंगचा प्रकार असून, तिच्या वडिलांनीच तिची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह मथुरेतील राया परिसरात फेकला.  आता पोलिसांनी आयुषीच्या वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

याबाबत पोलीस अधिकारी एमपी सिंह यांनी सांगितले की, सदर तरुणी १७ नोव्हेंबर रोजी सकाळी घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी यमुना एक्स्प्रेस वेच्या सर्व्हिस रोडवर एका ट्रॉली बॅगमध्ये तिचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडला होता. या तरुणीच्या डोक्यावर हात आणि पायांवर जखमांच्या खुणा होत्या. तसेच तिच्या छातीवरही गोळी झाडल्याची खूण होती. मथुरा पोलिसांना मृत तरुणीची ओळख पटवण्यासाठी आठ पथके तैनात करण्यात आली होती. पोलिसांची ही पथके तरुणीची ओळख पटवण्यासाठी गुरुग्राम, आग्रा, अलिगड, हाथरस, नोएडा आणि दिल्लीपर्यंत पोहोचली होती.

पोलिसांनी सांगितले की, मृत तरुणीची ओळख आयुषी यादव अशी पटली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या आई आणि भावाकरवी तिची ओळख पटवली. त्यानंतर आता पोलीस या तरुणीची हत्या कुणी आणि का केली, याचा शोध घेत आहेत.   

१८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजत यमुना एक्स्प्रेसवेच्या सर्विस रोडवर कृषी संशोधन केंद्राजवळ झाडांमध्ये लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये रक्ताने माखलेला एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. तिची गोळी झाडून हत्या केल्याचे दिसत होते. त्यानंतर तिचा मृतदेह बॅगमध्ये भरून फेकला होता.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीFamilyपरिवार