शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मनाविरोधात लग्न केले म्हणून माहेरच्यांनीच केले अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 06:52 IST

दहिसर पोलिसांनी पुणे-साताऱ्यातून चौघांना पकडले.

ठळक मुद्देदहिसर पोलिसांनी पुणे-साताऱ्यातून चौघांना पकडले 

घरच्यांच्या मनाविरोधात लग्न केले म्हणून लेकीचे अपहरण करण्याचा प्रकार दहिसरमध्ये गुरुवारी उघडकीस आला. एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशीच ही घटना जरी असली तरी त्या ‘रिअल लाईफ’च्या अपहरणकर्त्यांना अवघ्या चोवीस तासांत दहिसर पोलिसांनी पुणे आणि साताऱ्यातून पकडले. ज्यात अपह्रत मुलीची आई आणि मावशी व होणाऱ्या नवऱ्याचा समावेश आहे. आई कोइल अम्माल देवेंद्र (४६), मावशी पोंनु ताई (४३), नातेवाईक नाडार स्वामी (३०) आणि चालक अरुण कुमार देवेंद्र (२६) अशी या अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

दहिसर पोलीस ठाण्यात बुधवारी पॉलसिंह नाडार (३५) नामक व्यक्तीने त्याच्या पत्नीचे एसव्ही रोडच्या सम्मेलन हॉटेलजवळून नातेवाईकांकडून अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार दहिसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिनव पवार, पोलीस उपनिरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे आणि पथक यांनी तातडीने याप्रकरणी तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यात फारशी माहिती हाती न लागल्याने कोइलच्या मोबाइल क्रमांकाचे लोकेशन शोधण्यात आले. त्याच ठिकाणी अपहरणकर्त्यांनी वापरलेली गाडी देखील असल्याचे पोलिसांना समजले.मुंबई-पुणे महामार्गावरच दहिसर पोलिसांनी चालक अरुणकुमार तर साताऱ्यात गाडी थांबवत अन्य तिघांना अटक केली. कोइल यांच्या मुलीने २०१९ मध्ये घरच्यांच्या मनाविरोधात लग्न केले होते. जे त्यांना मंजूर नव्हते. त्यामुळे हा प्रकार केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

दुसरे लग्न लावण्यासाठी रचला होता डावदहिसर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी लावत त्या वर्णनाचे लोक दिसल्यास गाडी अडविण्यास सांगितले. विवाहित मुलीला साताऱ्याला नेऊन तिचे अरुणकुमार सोबत लग्न लावण्याचे तिच्या आईने ठरवले होते. यासाठी तिने हा अपहरणाचा डाव रचला होता. 

टॅग्स :MumbaiमुंबईPoliceपोलिसArrestअटकmarriageलग्न