शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

विरारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार; प्रियकराने डोक्यात बाटली फोडली म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 16:15 IST

पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपीला केले अटक 

मंगेश कराळे

लोकमत न्यूज नेटवर्क

नालासोपारा :- विरारमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी घडली आहे. विरार पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केले आहे. 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विरारमध्ये एका परिसरात १९ वर्षीय पीडित तरुणी आणि तिचा प्रियकर बुधवारी संध्याकाळी बसले होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या दोन्ही आरोपीने प्रियकराच्या गळ्यातून सोन्याचे पेंडल खेचून पळून गेले. दोघेही ते सोन्याचे पेंडल विकण्यासाठी गेले पण कोणीही ते विकत घेतले नाही म्हणून दोन्ही आरोपी परत प्रियकर आणि तरुणी बसलेल्या ठिकाणी गेले. दोन्ही नराधम आरोपींनी पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी विरोध करताना प्रियकराने बाजूला पडलेली काचेची बॉटल एका आरोपीच्या डोक्यावर मारली.

जखमी अवस्थेतील आरोपी व दुसरा आरोपी पळून गेले. ही माहिती विरार पोलिसांना मिळाल्यावर घटनास्थळी पोलीस पोहचले. त्याठिकानाहून मुलीला उपचारासाठी डॉक्टरकडे पाठवले आणि फरार दोन्ही आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. एक आरोपी जखमी झाल्याने जवळच्या डॉक्टरकडे उपचारासाठी गेला असेल असा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी व्हाट्सअपच्या ग्रुपवर ही माहिती टाकल्यावर एका डॉक्टरांनी असा आरोपी उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर ठिकाणी जाऊन विरार पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केले आहे. 

दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केले आहे. आरोपींवर जबरी चोरी, खंडणी, बलात्कार, अनैसर्गिक बलात्कार अश्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. - राजेंद्र कांबळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे)

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी