शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

'फोटो पाठव नाही तर जीव देईन', प्रियकराच्या धमकीने घाबरून प्रेयसीने विष पिऊन संपवलं जीवन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 13:11 IST

Uttar Pradesh : दोघेही फोनवर तासंतास बोलत होते. गुरूवारी प्रियकराने प्रेयसीला व्हॉट्सअॅपवर फोटो मागितला. प्रेयसीने फोटो देण्यास नकार दिला.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेलीमध्ये प्रियकर नाराज झाल्याने प्रेयसीने विष पिऊन आत्महत्या केली. असं सांगितलं जात आहे की,  बरेली कॉलेजमध्ये शिकणारी विद्यार्थीनी बॅंकेत काम करणाऱ्या एका तरूणावर प्रेम करत होती. दोघेही फोनवर तासंतास बोलत होते. गुरूवारी प्रियकराने प्रेयसीला व्हॉट्सअॅपवर फोटो मागितला. प्रेयसीने फोटो देण्यास नकार दिला.

प्रियकर पुन्हा पुन्हा हट्ट करत होता, पण प्रेयसीने तिचा फोटो काही पाठवला नाही. प्रियकराने तिला व्हिडीओ कॉलवर बोलण्यास सांगितलं. प्रेयसीने त्यासाठीही नकार दिला. ज्यामुळे प्रियकर नाराज झाला. त्याने प्रेयसीला धमकी दिली की, तो ट्रेन खाली उडी घेऊन जीव देणार. मग त्याने फोन कट केला. प्रेयसी त्याला सतत फोन करत होती. पण त्याने फोन उचलला नाही. प्रेयसीने त्याला 40 वेळा फोन केला. जेव्हा त्याने एकदाही फोन उचलला नाही तर ती घाबरली.

प्रेयसीला वाटलं प्रियकर खरंच जीव देणार की काय. यामुळे ती घाबरलेल्या प्रेयसीने रात्री घरात पडलेलं विषारी द्रव्य प्यायलं. तिची तब्येत बिघडली तर तिला कुटुंबियांनी लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण तिची तब्येत जास्तच बिघडली. शुक्रवारी उपचारादरम्यान तरूणीचा मृत्यू झाला. यादरम्यान तिच्या प्रियकराला प्रेयसीने विष प्यायल्याचं समजलं. तेव्हा त्याने मेसेज केला की, तुला काही झालं तर तुझ्या घरच्यांना जीवे मारणार.

कुटुंबियांचा आरोप आहे की, बॅंक कर्मचारी संचित अरोराने तिच्यावर दबाव टाकल्याने तिने आत्महत्या केली. तरूणीच्या अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी कुटुंबियांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली. सध्या प्रियकर संचित अरोर फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी