शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बर्थडेच्या आदल्या रात्रीच झाला घात; प्रियकराकडून तरुणीची निर्घृण हत्या, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 16:26 IST

गळ्यावर, हातावर आणि पायावर ब्लेडच्या खोल जखमा झाल्या होत्या. पोलिसांनी सदर तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

Chennai Murder Case ( Marathi News ) : प्रेम प्रकरणातून सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीला जिवंत जाळून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूतील थलांबूर इथं घडली आहे. शनिवारी ही धक्कादायक घटना घडली असून आर. नंदिनी (वय २५) असे मृत तरुणीचं नाव आहे. पोलिस पथकाने सदर तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबर रोजी रात्री एक तरुणी पोलिसांना अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळली. तिच्या गळ्यावर, हातावर आणि पायावर ब्लेडच्या खोल जखमा झाल्या होत्या. पोलिसांनी सदर तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आर. नंदिनी असं तिचं नाव असल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं आहे असून ती मूळची मदुराई येथील रहिवासी असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. 

नंदिनी आणि पांडी माहेश्वरी (वय २६) हा तृतीयपंथी हे मदुराईतील एकाच महाविद्यालयात एकत्र शिकले होते. पुढे माहेश्वरी याने आपलं नाव बदलून वेत्रीमारण असं ठेवलं. नंदिनी आणि वेत्रीमारण हे गेल्या आठ महिन्यांपासून थोराईपक्कम येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होते. यादरम्यान ती वेत्रीमारण याच्या प्रेमात पडली. मात्र नंतर दोघांमध्ये खटके उडाले आणि नंदिनी ही वेत्रीमारण याच्यापासून दूर झाली. मात्र नंदिनीच्या या निर्णयाने वेत्रीमारण संतापला आणि त्याने तिचा काटा काढण्याचं ठरवलं.

दरम्यान, २४ डिसेंबर रोजी नंदिनीचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सरप्राइज गिफ्ट देणार असल्याचं सांगून वेत्रीमारण याने नंदिनीला एका अज्ञात ठिकाणी नेलं आणि तिथं तिची निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांनी शनिवारी वेत्रीमारण याला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChennaiचेन्नई