शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

Tit for Tat ! तरुणाने जबरदस्तीनं Kiss केलं, मुलीने दातांनी ओठांचा पाडला तुकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 13:14 IST

Crime News : शनिवारी दुपारी एक तरूणी शेतात काम करत होती. तिला एकटी पाहून तिथून जात असलेल्या तरूणाने तिच्यासोबत छेडछाड सुरू केली.

Crime News :  उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमध्ये एका तरूणीसोबत जबरदस्ती करणं एका तरूणाला चांगलंच महागात पडलं. रेप करण्याचा प्रयत्न करत असलेल्या नराधमाच्या ओठाचा तरूणीने आपल्या दातांनी लचका तोडला. पोलिसांना जखमी तरूणाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. सोबतच पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखलही केला आहे.

दौराला गावातील अंझोता जंगलात शनिवारी दुपारी एक तरूणी शेतात काम करत होती. तिला एकटी पाहून तिथून जात असलेल्या तरूणाने तिच्यासोबत छेडछाड सुरू केली. त्याने जबरदस्तीने तरूणीचा किस घेण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर बहादूर तरूणीने हिंमत दाखवत त्याच्या ओठांना दाताने चावा घेतला आणि तुकडा पाडला. त्यानंतर आरोपीला धडाही शिकवला. 

ओठाचा तुकडा पडल्यानंतर तरूणी वेदनेने जोरजोरात ओरडत होता. तरूणीने आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना जमा केलं. लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांना सूचना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेतलं. त्याच्या ओठाचा तुकडाही तिथेच पडला होता. पोलिसांनी तो पॅकेटमध्ये सील केला आणि आरोपीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

चौकशी केल्यावर तरूणाचं नाव मोहित सैनी असल्याचं समजलं. पीडितेने त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलीस अधिकारी संजय शर्मा म्हणाले की, तरूणी तिच्या शेतात काम करत होती. आजूबाजूला फार कुणी नव्हतं. तरूण तिथून पायी जात होता आणि त्याने तरूणीसोबत छेडछाड सुरू केली. तरूणाने तरूणीला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला. बचाव करण्यासाठी तरूणीने त्याच्या ओठाचा दातांनी तुकडा पाडला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी