शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील पेट्रोल पंपावरील मुलीला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 18:36 IST

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

ठळक मुद्देउल्हासनगर कॅम्प नं-४ येथील भारत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम मुली करतात. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तरुणाचा शोध घेत आहेत.

उल्हासनगर - पेट्रोल भरताना मोबाईल बंद ठेवा असे सुचविताच राग आलेल्या तरुणाने पेट्रोल भरणाऱ्या तरुणीला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. शिवजयंतीदिवशी भारत पेट्रोल पंपावर रात्री 9 वाजता घटना घडली असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील भारत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम मुली करतात. बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान एक तरुण पेट्रोल भरण्यासाठी आला होता. गाडीत पेट्रोल भरताना तरुण मोबाईलचा वापर करीत होता. त्यावेळी पेट्रोल भरणाऱ्या तरुणीने पेट्रोल भरतांना मोबाईल बंद ठेवा, असे विनंतीपूर्वक सुचविले. याचा राग तरुणाला येऊन त्याने तरुणीच्या कानाखाली मारून अश्लील शिवीगाळ केली.

याप्रकाराने खळबळ उडून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी तरुणाला समज दिली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तरुणाचा शोध घेत आहेत. भारत पेट्रोल पंपावर तरुण मुली काम करीत असून यापूर्वीही पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगरPetrol Pumpपेट्रोल पंप