शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अनेकदा प्रपोज करुनही तरुणाचा नकार; तरुणीकडून भररस्त्यात ब्लेडनं सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 16:10 IST

तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू; अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार नाही

बरेली: एकतर्फी प्रेमातून तरुणीनं तरुणावर ब्लेडनं वार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये घडली आहे. वारंवार प्रपोज करुनही तरुण नकार देत असल्यानं तरुणीनं ब्लेडनं चेहऱ्यावर वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तरुणीनं अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही. बरेलीतल्या हाफिजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक कनिष्ठ महाविद्यालय आहे. पीडित तरुण आणि त्याच्यावर हल्ला करणारी तरुणी याच महाविद्यालयात शिकतात. तरुणीचं विद्यार्थ्यावर प्रेम आहे. मात्र तरुणाला तिच्याबद्दल प्रेम भावना नाहीत. तरुणीनं पीडित तरुणाला अनेकदा प्रपोज केलं. मात्र त्यानं नकार दिला. त्यामुळे तरुणीनं त्याच्या चेहऱ्यावर ब्लेडनं वार केले. पीडित तरुण अभ्यासावर जास्त लक्ष देतो. तर तरुणी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती, अशी माहिती समोर आली आहे. तरुणानं वारंवार नकार दिल्यानं तरुणीनं भररस्त्यात त्याच्या चेहऱ्यावर ब्लेडनं वार केले. यामध्ये तरुण रक्तबंबाळ झाला. त्याला पाहून तरुणीदेखील भोवळ येऊन पडली. 'तुला तुझ्या चेहऱ्याचा गर्व आहे ना? मग मी तो चेहराच विद्रूप करते,' असं म्हणत तरुणीनं तरुणावर वार केल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.तरुणीच्या हल्ल्यात जखमी झालेला तरुण सध्या बोलण्याच्या स्थितीत नाही. त्याच्या चेहऱ्यावर ब्लेड हल्ल्याच्या जखमा आहेत. तर हा संपूर्ण प्रकार पाहून तरुणीची आई अतिशय हैराण झाली आहे. ही घटना महाविद्यालयाबाहेर घडल्याची माहिती प्राचार्यांनी दिली. सर्व विद्यार्थी परीक्षा देऊन महाविद्यालयातून निघाल्यानंतर हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं. तरुण-तरुणी दोघेही अल्पवयीन असून या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश