शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

घाटकोपर व्यापारी हत्या प्रकरण : 'या' अभिनेत्रीचा पोलिसांनी नोंदविला जबाब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 12:16 IST

या व्यापाऱ्याच्या कॉल डिटेल्समधून तो अनेक बार गर्ल्स आणि टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींशी संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच संदर्भात पोलिसांनी छोट्या पडद्यावरची अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिच्यासहीत जवळपास २५ जणांची चौकशी केली आहे.  

ठळक मुद्देकॉल डिटेल्स खंगाळून काढल्यानंतर पोलिसांसमोर वेगवेगळी माहिती उघड होताना दिसत आहेपोलिसांनी छोट्या पडद्यावरची अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिच्यासहीत जवळपास २५ जणांची चौकशी केली आहे.  कॉल डिटेल्समधून तो अनेक बार गर्ल्स आणि टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींशी संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती

मुंबई - पनवेल परिसरात नेहरे भागात घाटकोपरच्या राजेश्वर उदानी या हिरे व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय. हा व्यापारी २८ नोव्हेंबरपासून बेपत्ता झाला होता. घाटकोपर पूर्वेकडील पूर्व द्रुतगती महामार्गालगत विक्रोळी वाहतूक चौकीसमोरील कॉर्नरला या व्यापाऱ्याची कार पोलिसांना सापडली होती. कॉल डिटेल्स खंगाळून काढल्यानंतर पोलिसांसमोर वेगवेगळी माहिती उघड होताना दिसत आहे. या व्यापाऱ्याच्या कॉल डिटेल्समधून तो अनेक बार गर्ल्स आणि टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींशी संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच संदर्भात पोलिसांनी छोट्या पडद्यावरची अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिच्यासहीत जवळपास २५ जणांची चौकशी केली आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई आणि रायगडच्या अनेक बार गर्ल्सच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश होता. छोट्या पडद्यावर हिंदी मालिकांमध्ये करणारी अभिनेत्री देवेलीनाचंही नाव या कॉल डिटेल्समधून समोर आलं आहे.  अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीचे जबाब नोंदविण्याचे काम पंत नगर पोलीस ठाण्यात सुरु आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घाटकोपर परिसरात राहणारा राजेश्वर हा हिरे व्यापारी घरी चार तासात परत येतो असं सांगून घराबाहेर पडला होता. परंतु, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तो परतला नाही. त्यानंतर मुलगा रोनक याने पंतनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.  या संदर्भात पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. राजेश्वर दुसऱ्याच एका गाडीतून नवी मुंबईच्या दिशेनं जाताना या फुटेजमधून दिसत आहे. 3 डिसेंबर रोजी पनवेल भागातील झाडाझुडपात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. परंतु, त्याची ओळख पटवणं कठिण होतं. राजेश्वर यांचे कपडे आणि बूटांची ओळख पटवल्यानंतर हा मृतदेहाची ओळख पटली.यानंतर पोलिसांनी राजेश्वर यांचे कॉल डिटेल्स काढले.  ७० हजार रुपयांच्या देण्या - घेण्यावरून वाद सुरु होता असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 

खळबळजनक! घाटकोपरमधील व्यापाऱ्याची अपहरण करून हत्या?

टॅग्स :Murderखूनbollywoodबॉलिवूडbusinessव्यवसायGhatkoparघाटकोपरpanvelपनवेल