शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

न्यूज क्लिकप्रकरणी दिल्ली पोलिसांनी केली गौतम नवलखा यांची चौकशी

By नारायण जाधव | Updated: December 30, 2023 20:36 IST

परदेशी फंड वापरल्याचा आरोप, आग्रोळीतील रणदिवे वाचनालयात दिली भेट

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नजरकैदेत असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांची शनिवारी दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिकच्या कथित परदेशी फंड आणि देशविरोधी कारवाया संदर्भात चौकशी केली. नवलखा हे सध्या नवी मुंबईतील आग्रोळी येथील बी.टी. रणदिवे वाचनालयात न्यायालयाच्या आदेशावरून नजरकैदेत आहेत. त्या ठिकाणीच भेट देऊन दिल्ली पोलिसांच्या सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांची चौकशी केली.

ऑगस्ट महिन्यात विशेष सेलने न्यूजक्लिकच्या विरोधात बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत एफआयआर नोंदविला होता. ‘भारताच्या सार्वभौमत्वाला बाधा आणून देशाविरुद्ध असंतोष निर्माण करण्यासाठी’ चीनमधून मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचा आरोप न्यूज क्लिकवर ठेवला आहे. यानंतर तपास यंत्रणेने न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि मानव संसाधन विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांना ३ ऑक्टोबर रोजी अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

पोलिसांच्या एफआयआरमध्ये चीनकडून मिळालेला निधी गौतम नवलखा आणि त्यांचे सहकारी तिस्ता सीतलवाड, त्यांचे पती आणि जावेद आनंद आणि पत्रकार उर्मिलेश, अरात्रिका हलदर, परंजॉय गुहा ठाकूरता आणि अभिसार शर्मा आणि इतरांना वाटल्याचा आरोप ठेवला आहे. याशिवाय

नवलखा यांचे १९९१ पासून पुरकायस्थशी संबंध असून २०१८ पासून PPK NewsClick Studio Private Limited चे भागधारक असल्याचा आरोप आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक प्रक्रियेत तोडफोड करण्यासाठी पुरकायस्थ यांनी - पीपल्स अलायन्स फॉर डेमोक्रसी अँड सेक्युलॅरिझम (PADS) - या गटाशी कट रचला असा आरोप आहे. याच आरोपांच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांचे पथक नवलखा यांच्या चौकशीसाठी नवी मुंबईत आल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई