शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

गौरी लंकेश हत्या : सनातन साधक मुख्य आरोपीचे औरंगाबाद कनेक्शन उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 15:46 IST

या पूर्वी अनिसचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर आणि  साहित्यीक गोविंद पानसरे खूनप्रकरणात औरंगाबाद कनेक्शन समोर आले आहे.

ठळक मुद्देऋषिकेशमूळचा सोलापूरचा होता, मात्र  २०१२ पासून तो औरंगाबादमध्ये राहत असेसनातनचे पूर्णवेळ काम करण्याचे सांगून सोडले औरंगाबाद

औरंगाबाद:  ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणात औरंगाबाद कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. कर्नाटक विशेष तपास पथकाने(एसआयटी) गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित आरोपी ऋषिकेश देवडीकर हा औरंगाबादेतील एन-९ भागात राहत होता. या पूर्वी अनिसचे नरेंद्र दाभोळकर आणि  साहित्यीक गोविंद पानसरे खूनप्रकरणात औरंगाबाद कनेक्शन समोर आले आहे.

गौरी लंकेश हत्या प्रकरणात एसआयटीला मोठं यश; मुख्य आरोपी ऋषिकेशला अटक

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यवाह डॉ. नरेंद्र दाभोळकर, साहित्यीक गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणात एटीएस, सीबीआयने औरंगाबादेतील शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना अटक केली. हे दोन्ही संशयित सध्या कारागृहात आहेत. महाराष्ट्रातील नामवंत विचारवंताचा खूनप्रकरणात औरंगाबादचे नाव आल्याने शहरात खळबळ उडाली होती. या घटनेचा विसर पडतच असताना कर्नाटकमधील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश खूनप्रकरणात एसआयटीने औरंगाबादच्या ऋषिकेश देवडीकरला शुक्रवारी अटक केली.

ऋषिकेशमूळचा सोलापूरचा होता, मात्र  २०१२ पासून तो  सिडको एन-९ मध्ये यशवंत शुक्ला यांच्या घरात  भाडेकरू म्हणून आई-वडिल,पत्नी, आणि सात वर्षाच्या मुलीसह  राहण्यास आला होता. ऋषिकेशने येथे आल्यानंतर पतंजलीचे साहित्य विक्रीचा घरातून व्यवसाय सुरू केला. ग्राहक वाढत असल्याचे पाहून त्याने एन-९,एम-२ रोडवर जगदीश कुलकर्णी यांचा गाळा भाड्याने घेऊन संस्कृती स्वदेशी साहित्य नावाने दुकान सुरू केले. येथे दुकान चालवित असताना तो सनातनचा कार्यकर्ता म्हणून काम करीत असे. सनातनने आयोजित कार्यक्रमात त्याचा सक्रिय सहभाग असे, अशी माहिती त्याच्या शेजाऱ्यांनी दिली. 

सनातनचे पूर्णवेळ काम करण्यासाठी सोडले शहर ऋषिकेशचे दुकान जोरात सुरू असताना सनातन संस्थेचे पूर्णवेळ काम करायचे आहे, असे सांगून दुकानमालक कुलकर्णी यांना सांगून त्याने नोव्हेंबर २०१६ मध्ये त्याने दुकान बंद केले. दुकानातील मालासह कुलकर्णी यांनी त्याचे दुकान चालवायला घेतले. यानंतर ऋषिकेश पत्नी आणि मुलीला घेऊन गोव्यातील आश्रमात जायचे आहे, असे सांगून गल्लीतील लोकांना आणि आईवडिलांना औरंगाबादेतून गेला. यानंतर तो औरंगाबादला नाही. त्याचे वृद्ध आई-वडिल एप्रिल २०१९ मध्ये शुल्का यांचे घर सोडून मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या मुलाकडे राहण्यास गेले आहेत. 

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशArrestअटकSanatan Sansthaसनातन संस्थाPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद