शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भर कोर्टात गँगवॉर; वकिलाच्या वेशात येऊन गँगस्टरला केले ठार; दिल्लीत न्यायाधीशांसमोरच गुंडावर झाडल्या गोळ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 06:24 IST

एखाद्या चित्रपटातील भयावह कथानक असावे अशी ही घटना शुक्रवारी दुपारी रोहिणी न्यायालयात घडली. गोळीबार होताच न्यायालयात गोंधळ उडाला. सगळ्यांचा भीतीने थरकापच उडाला. लोक जीवाच्या भीतीने पळू लागले.

विकास झाडे - 

नवी दिल्ली : येथील रोहिणी भागातील न्यायालयात दोन बदमाशांनी अंदाधुंद गोळीबार करून कुख्यात गुंड जितेंद्र मान ऊर्फ गोगीची न्यायाधीशांसमोरच हत्या केली. वकिलाचे कपडे घालून आलेल्या या बदमाशांनी गोळ्या झाडल्या. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्या दोघांचाही खात्मा झाला आहे.

एखाद्या चित्रपटातील भयावह कथानक असावे अशी ही घटना शुक्रवारी दुपारी रोहिणी न्यायालयात घडली. गोळीबार होताच न्यायालयात गोंधळ उडाला. सगळ्यांचा भीतीने थरकापच उडाला. लोक जीवाच्या भीतीने पळू लागले.

जितेंद्र मान ऊर्फ गोगी याला कोर्टरूममध्ये सुनावणीसाठी आणण्यात आले होते. एका वकिलाने सांगितले की, न्यायाधीशांच्या समोरच बदमाशांनी गोगीवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. त्यात दोन्ही हल्लेखोरांचाही जागीच मृत्यू झाला. 

पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका महिला वकिलाच्या पायाला गोळी लागली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास करीत आहेत. रोहिणी भागातील सरकारी इमारती आणि न्यायालयातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

पूर्ववैमनस्यातून गोळीबार- रोहिणी कोर्ट बार असोसिएशनचे माजी सचिव सत्यनारायण शर्मा म्हणाले की, अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. या घटनेमागे गँगवॉर असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये गोगीचा प्रतिस्पर्धी टिल्लू टोळीचा सहभाग असल्याची पोलिसांना भीती आहे. - टिल्लू टोळीचे गोगीशी खूप जुने वैर असल्याचे सांगितले जाते. गोगी व टिल्लू ताजपुरिया टोळी डोकेदुखी ठरली होती. - गोगीला विशेष कक्षाने गेल्या वर्षी मार्चमध्ये गुरुग्राममधून पकडले होते. त्यावेळी त्याच्यावर साडेसहा लाखांचे बक्षीस होते. टिल्लू-गोगी हे महाविद्यालयात शिकत असताना शत्रू बनले, त्यांनी एका प्रसिद्ध गायकाची हत्याही केली होती.

गोगीवर झाडल्या चार गोळ्यापोलिसांनी सांगितले की, गोगीला रोहिणी कोर्ट रूम २०७ मध्ये संबंधित खटल्याची सुनावणी होती. गोगीला मारण्यासाठी आलेल्या राहुल फंडा व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी तिथल्यातिथे गोळ्या घालून ठार केले. गोगीसह तीन बदमाशांचा मृत्यू झाला आहे. आपणास कुणीही ओळखू नये म्हणून दोघे आरोपी न्यायालयात वकिलाचा वेश परिधान करून आले होते. गोगीला तीन ते चार गोळ्या लागल्या.

पोलिसांना ५० हजार -दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी या घटनेनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, पोलिसांनी न्यायालयात प्रसंगावधान बाळगल्याने फार नुकसान झाले नाही. हल्लेखोरांना ठार करणाऱ्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीCourtन्यायालयPoliceपोलिस