शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Tillu Tajpuriya Murder : तिहार जेलमध्ये गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची हत्या, लोखंडी रॉडने केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 10:40 IST

टिल्लू ताजपुरियावर प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्यांनी हल्ला केला.

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील तिहार तुरुंगात गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची हत्या करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. टिल्लू ताजपुरियावर प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्यांनी हल्ला केला. हल्ला केल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या रोहिणी कोर्टात झालेल्या गोळीबारातील आरोपी गँगस्टर टिल्लू ताजपुरिया याच्यावर तिहार तुरुंगात प्रतिस्पर्धी टोळी सदस्य योगेश टुंडा आणि इतरांनी लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर तुरुंग अधिकाऱ्यांनी टिल्लू ताजपुरियाला दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात नेले. याठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी पोलीस तपासात गुंतले आहेत.

गोगी हत्याप्रकरणात टिल्लू ताजपुरियाचे नाव आले होते समोर दिल्लीतील गँगस्टर जितेंद्र उर्फ ​​गोगी याची 24 सप्टेंबर 2021 रोजी दिल्लीच्या रोहिणी कोर्टात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सुनील उर्फ ​​टिल्लू ताजपुरियाचे नाव समोर आले होते. जितेंद्र उर्फ ​​गोगी रोहिणी कोर्ट क्रमांक 207 मध्ये दाखल होताच हल्लेखोरांनी गोळीबार केला. पहिली गोळी त्याच्या पाठीला लागली. गोळी लागताच त्याने मागे वळून हल्लेखोरांकडे पाहिले, तेव्हा त्याच्या छातीत दुसरी गोळी लागली.

गोळीबार होताच कोर्ट रुममध्ये चेंगराचेंगरी झाली. न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांनी आपापल्या रुममध्ये जाऊन आपले प्राण वाचवले. तेथे उपस्थित इतर वकील अहलमद यांच्या रुममध्ये घुसले. गोळी लागताच गोगीसोबत आत गेलेल्या कमांडोंनी हल्लेखोरांवर गोळीबार करून त्यांना ठार केले. हे हल्लेखोर टिल्लू टोळीचे सदस्य होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी