शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

गर्ल्स हॉस्टेलमधून डॉनचं साम्राज्य चालवत होती गर्लफ्रेन्ड, उद्योगपतींकडून मागत होती खंडणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 15:25 IST

सुजीत सिन्हाची प्रेयसी प्रियांचा रांचीतील कडरू येथील एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये लपून पूर्ण गॅंग चालवत होती. ती गर्ल्स हॉस्टेलमध्ये एक विद्यार्थी म्हणून राहत होती.

झारखंडची राजधानी रांचीसहीत अनेक जिल्ह्यातील पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेला कुख्यात गॅंगस्टर सुजीत सिन्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो चर्चेत आला त्याचं साम्राज्य सांभाळत असलेल्या त्याची प्रेयसी प्रियांका कुमारी उर्फ खुशबू उर्फ सृष्टीमुळे. प्रियांका ही सुजीत सिन्हाच्या गॅंगची दुसरी मुख्य व्यक्त आहे. ती रांचीमध्ये मोठ्या उद्योगपतींना आणि बिल्डरांना खंडणी मागत होती. हा प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू होता. आता एक-एक करून या गॅंगच्या सर्व सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

गर्ल्स हॉस्टेलमधून चालवत होती गॅंग

सुजीत सिन्हाची प्रेयसी प्रियांचा रांचीतील कडरू येथील एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये लपून पूर्ण गॅंग चालवत होती. ती गर्ल्स हॉस्टेलमध्ये एक विद्यार्थी म्हणून राहत होती. तिने डाल्टेनगंजच्या एका कॉलेजमधून बीबीएचं शिक्षणही घेतलं. प्रियांकाची मैत्री मेहश सुजीत सिन्हासोबत झाली होती. त्यानंतर सुजीतसाठी ती काम करू लागली होती. ती गॅंगमध्ये सामिल झाली. तिने आपल्या गॅंगमध्ये दोन जुळ्या भावांनाही सामिल करून घेतलं होतं. प्रियांका जमीन व्यापाऱ्यांची एक लिस्ट तयार केली होती. त्या आधारेच ती त्यांना फोन करून खंडणी मागत होती. (हे पण वाचा : पर्दाफाश! महिलांच्या जाळ्यात अडकून पुरूष काढायचे कपडे, नंतर फेक पोलीस येऊन करत होते ब्लॅकमेल!)

अनेक बिल्डरांनी सुजीत सिन्हाच्या नावावर खंडणीही दिली आहे. त्यांना जीवाची भीती होती. मात्र, एका उद्योगपतीकडे खंडणी मागितल्यावर गॅंगची हालचाल पोलिसांच्या नजरेस पडली. यानंतर प्रियांकासहीत चार लोक पकडले गेले. त्यांच्याकडून दागिने, मोबाइल जप्त केलेत.

रांचीचे एसएसपी सुरेंद्र झा म्हणाले की, सुजीत सिन्हाची प्रेयसी प्रियांका पलामू येथील डब्ल्यू सिंह गॅंगच्या लव सिंहच्या हत्येत हनी ट्रॅपच्या रूपात सामिल होती. या केसमद्ये ती तुरूंगातही गेली होती. तुरूंगात कैद असलेल्या सुजीत सिन्हासोबत प्रियांका सतत संपर्कात राहत होती आणि  सिन्हाच्या अनउपस्थितीत ती गॅंग चालवत होती. याबदल्यात तिला दर महिन्याला मोठी रक्कमही मिळत होती. (हे पण वाचा : दिल्लीत कोट्यवधींचा बंगला...लक्झरी कार्स, तृतीयपंथीयाच्या हत्येनंतर धक्कादायक खुलासे!)

पोलिसांच्या डायरीनुसार झारखंडमध्ये एकूण ३६ गुन्हेगारी गॅंग आहे. त्यातील सर्वात जास्त सक्रिय आहे सुजीत सिन्हा याची गॅंग. एक वर्षांपासून या गॅंगने पोलिसांना हैराण करून सोडलं आहे. सुजीत सिन्हावर खंडणी आणि हत्या सहीत एकूण ५१ केसेस दाखल आहेत. सुजीत तुरूंगातून प्रियांकाच्या मदतीने गॅंग चालवत आहे.  

टॅग्स :JharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारी