सराईत गुन्हेगारांनी पिस्तुल रोखल्याने पोलिसांचा गोळीबार; पाचजण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 06:02 PM2019-09-11T18:02:47+5:302019-09-11T18:12:30+5:30

पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ दोन राऊंड केले फायर

gangster pointed pistol on Nanded police; Five people were arrested | सराईत गुन्हेगारांनी पिस्तुल रोखल्याने पोलिसांचा गोळीबार; पाचजण अटकेत

सराईत गुन्हेगारांनी पिस्तुल रोखल्याने पोलिसांचा गोळीबार; पाचजण अटकेत

Next
ठळक मुद्देनांदेड शहरानजीक कारवाई 

नांदेड : गुन्हे करण्याच्या बेतात असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. ही कारवाई बुधवारी पहाटे नांदेड शहरानजिक असर्जन चौक ते हस्सापूर रोड येथे करण्यात आली. या घटनेत स्वसंरक्षणार्थ पोलिस पथकाने सर्व्हीस रिव्हॉल्वरमधून दोन राऊंड फायर केले. या आरोपींकडून देशी बनावटीच्या पिस्टलसह एक जिवंत काडतूस आणि खंजर असे घातक शस्त्र जप्त करण्यात आले आहे.  

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला पेट्रोलिंग करीत असताना गोवर्धनघाट पुलाजवळ एका मोटारसायकलवरुन तीन इसम जात असल्याचे दिसले. पोलिसांचे वाहन पाहिल्यानंतर अचानक मोटारसायकलवरुन या दुचाकीस्वारांनी  विष्णूपुरीकडे पलायन केले.  यामुळे पोलिस पथकाचा संशय वाढला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामराव गाडेकर व इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ ग्रामीण पोलिस ठाण्याला बिनतारी संदेश व भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करुन मदतीला बोलावले आणि सदर दुचाकी स्वारांचा पाठलाग केला. हे दुचाकीस्वार नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असर्जन चौक ते हस्सापूर रस्त्यावरील ‘आस्था आरंभ सिटी’च्या पाटीजवळ मोटारसायकल उभी करुन खाली उतरले. त्याचवेळी आणखी सहा लोक त्यांच्या मदतीला आले. पाठोपाठ आलेल्या पोलिस पथकाने रस्त्यावरील विजेच्या खांबाजवळ जीप थांबवून सदर लोकांना हालचाल करु नका, असा आवाज दिला असता पुढील इसम पुढे येवू नका, अन्यथा तुमच्यावर फायर करु, असे ओरडले.  मात्र त्याचवेळी सदर चोरट्यांना पोलिसांनी चारही दिशेने घेराव घातला. आरोपीतील एकांनी पोलिसांच्या दिशेने पीस्टल रोखले असता पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ सर्व्हीस रिव्हॉल्वरमधून चोरट्यांच्या दिशेने दोन राऊंड फायर केले.

यावेळी इंद्रपालसिंग उर्फ सन्नी तिरतसिंघ मेजर (वय २९, रा. चिखलवाडी), हारदीपसिंघ उर्फ सोनू उर्फ पिनीपाना बाजवा (वय ३०, शहीदपुरा), राजूसिंघ नानकसिंघ सरदार (वय ३२, रा. असर्जन), सय्यद सलीम स. रशिद (वय २१, रा. असरफनगर, हिंगोली गेट) आणि नागराज उर्फ लाल्या राजू चव्हाण (वय २७, रा. दत्तनगर) या पाच जणांना ताब्यात घेतले. तर इतर चोरटे अंधाराचा फायदा घेवून पसार झाले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांकडून देशी बनावटीचे एक पिस्टल, एक जिवंत काडतूस, एक खंजरसह मोटारसायकल जप्त केली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील नाईक यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम ३९९, ४०२, ५०६ भादंविसह कलम ३/२५ भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरक्षक जावेद शेख हे करीत आहेत.  पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

Web Title: gangster pointed pistol on Nanded police; Five people were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.