शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला जीवाचा धोका, दिल्लीतील तुरुंगात ठेवण्यास पोलिसांचा नकार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 17:36 IST

दिल्ली, पंजाब, यूपी, झारखंड, हरियाणा, राजस्थानमध्ये लॉरेन्स बिश्नोईची टोळी आता पसरली आहे. तो तुरुंगातून आपली टोळी चालवतो.

नवी दिल्ली: दिल्ली न्यायालयाने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या पोलीस कोठडीत 14 जूनपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने बिश्नोईची कोठडी पूर्ण झाल्यानंतर त्याला शहरातील कोणत्याही तुरुंगात ठेवू नये, त्याला थेट पंजाबच्या तुरुंगात पाठवावे, अशी मागणी तुरुंग प्रशासनाकडून होत आहे. यासाठी दिल्ली कारागृह प्रशासनाने न्यायालयात अर्ज केला आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने गुंडाची कोठडी पूर्ण झाल्यानंतर त्याला भटिंडा कारागृहात सोपवण्यास सांगितले आहे.

लॉरेन्स बिश्नोई बराच काळ भटिंडा मध्यवर्ती कारागृहात बंद होता. येथून त्याला गुजरात पोलिसांनी एका गुन्हेगारी खटल्याच्या तपासासाठी ताब्यात घेतले आणि गुजरातच्या साबरमती कारागृहात आणले. येथूनच दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका प्रकरणात ताब्यात घेऊन दिल्लीला आणले. या 11 जून रोजी लॉरेन्सला न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून पोलिसांची मागणी मान्य करत न्यायालयाने 14 जूनपर्यंत कोठडी वाढवली. यासोबतच दिल्ली तुरुंग प्रशासनाची मागणीही मान्य करण्यात आली असून, बिश्नोईची कोठडी पूर्ण झाल्यावर त्याला थेट भटिंडा कारागृहात सोपवण्यात यावे, असे म्हटले आहे. न्यायालयाने पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्याचे आदेशही दिले आहेत.

दिल्ली पोलीस काय म्हणाले?लॉरेन्स बिश्नोईच्या दिल्ली तुरुंगात राहिल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, असे दिल्ली पोलिसांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. दिल्लीतील तिहार तुरुंगात नुकत्याच झालेल्या अनेक टोळीयुद्धातील हत्येमुळे तिहार प्रशासनावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. टिल्लू ताजपुरियाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीवर हल्ला केला जाऊ शकतो, अशी भीती तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. दिल्ली तुरुंग प्रशासन याबाबत अगोदरच सतर्क असून कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाही.

कारागृहातूनच गुन्हेगारी सिंडिकेट कार्यरत लॉरेन्स बिश्नोईची टोळी आता दिल्ली, पंजाब, यूपी, झारखंड, हरियाणा, राजस्थानमध्ये पसरली आहे. सध्या लॉरेन्स बिश्नोई तुरुंगातून आपली टोळी चालवतो तर गोल्डी ब्रार कॅनडातून चालवतो. याशिवाय अमेरिकेतील लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि अझरबैजानमधील लॉरेन्सचा पुतण्या सचिन बिश्नोई हेदेखील बिश्नोई टोळी चालवत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिस