नागपुरात खंडणीबाज गँगस्टर कोत्तुलवारला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 09:27 PM2020-03-25T21:27:33+5:302020-03-25T21:28:38+5:30

चर्चित क्रिकेट बुकी हृदयराज ऊर्फ राज अलेक्झेंडरला २.३७ कोटी रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी कुख्यात गँगस्टर दिवाकर कोत्तुलवार याला अटक केली आहे.

Gangster Kotulwar arrested in Nagpur | नागपुरात खंडणीबाज गँगस्टर कोत्तुलवारला अटक

नागपुरात खंडणीबाज गँगस्टर कोत्तुलवारला अटक

googlenewsNext
ठळक मुद्देबुकी राज अलेक्झेंडरला मागितली होती २.३७ कोटीची खंडणी : गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चर्चित क्रिकेट बुकी हृदयराज ऊर्फ राज अलेक्झेंडरला २.३७ कोटी रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी कुख्यात गँगस्टर दिवाकर कोत्तुलवार याला अटक केली आहे. या प्रकरणात ही पहिलीच अटक आहे.
ही घटना गेल्या १७ मार्च रोजी घडली होती. रात्री ८.३५ वाजरा सागर मध्य प्रदेश येथील रहिवासी विक्की वाधवानी स्थानिक सट्टेबाज राहुल, आरिफ, स्वप्नील साळुंके आणि विलास पाटीलसह १२ पेक्षा अधिक गुन्हेगारांनी सदर रेसिडेन्सी रोड येथील कार्यालयात राजला मारहाण केली होती. त्याला अडीच तास बंधक बनवून २.३७ कोटी रुपयाची मागणी केली होती. रुपये न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी दिवाकर कोत्तुलवारने राजला ३५ लाख रुपये वसूल केल्याबाबतची तक्रार न करण्याची धमकी दिली होती. राजने या प्रकरणाची तक्रार पोलिसात केली. मीडियाकडून माहिती झाल्यावर गुन्हे शाखेने १९ मार्च रोजी सदर पोलिसात खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करायला लावला. यानंतर दिवाकर व इतर गुन्हेगारांचा शोध घेतला जात होता. मंगळवारी सायंकाळी दिवाकर गुन्हे शाखेच्या खंडणी वसुली विरोधीत पथकाच्या हाती लागला. त्याला न्यायालयासमोर सादर करीत एक दिवसाच्या पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.
सूत्रानुसार या प्रकरणात सामील आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध खून, खंडणी वसुलीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. सराईत गुन्हेगार असूनही ते शहरात क्रिकेट सट्ट्याचे अड्डे चालवित होते. याची माहिती असूनही पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. आठ महिन्यांपूर्वी गुन्हेगार विजय मोहोड याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील चिंटू चुग आजपर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही. चिंटूही क्रिकेट बुकी आहे. तो आरोपींशी जुळलेला होता.

Web Title: Gangster Kotulwar arrested in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.