शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लॉरेन्स बिश्नोईचा कट्टर दुश्मन कौशल चौधरीच्या पत्नीला अटक; खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 16:59 IST

हॉटेल मालकाकडून २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी गँगस्टर कौशल चौधरीची पत्नी मनीषा हिला अटक केली आहे.

हॉटेल मालकाकडून २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी गँगस्टर कौशल चौधरीची पत्नी मनीषा हिला अटक केली आहे. मनीषा परदेशात असलेला तिचा भाऊ सौरभ गाडौली याच्यासोबत मिळून ही गँग चालवत होती. वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ती खंडणीची मागणी करत होती आणि हॉटेलवर गोळीबारही करत होती. मनीषावर ६ गुन्हे दाखल असून ती जामिनावर जेलबाहेर आहे.

एसीपी क्राइम वरुण दहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेल मालकांकडून खंडणी मागितल्या जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. या प्रकरणी एसटीएफसह राजस्थान पोलीस आणि गुरुग्राम पोलिसांनी कारवाई केली, त्यानंतर गुरुग्राम पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी तिला पकडलं. पोलिसांनी मनीषाला देवीलाल कॉलनीतून अटक करून सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

एसीपीच्या म्हणण्यानुसार, मनीषा कौशलची संपूर्ण सिंडिकेट चालवत होती. मनीषानेच नीमराना, होशियारपूर आणि पंचकुलामध्ये गोळीबार केला होता. हत्येचा प्रयत्न आणि खंडणीच्या गुन्ह्यात ती तुरुंगात गेली असून जामिनावर बाहेर आल्यानंतर ती पुन्हा त्याच कामात व्यस्त आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू केला आहे.

कौशल चौधरी गुरुग्रामच्या भोंडसी जेलमध्ये आहे. कौशल चौधरी हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा कट्टर दुश्मन मानला जातो. गँगस्टर देवेंद्र बंबिहाच्या हत्येनंतर चौधरीने बंबिहा गँग सांभाळली. तो पूर्वी दुबईत राहत होता आणि तेथून तो हरियाणा आणि पंजाबमध्ये गुन्हे करत असे. पण २०२१ मध्ये पंजाब आणि गुरुग्राम पोलिसांनी संयुक्त कारवाईत त्याला पकडलं. तेव्हापासून तो जेलमध्ये आहे.

लॉरेन्स बिश्नोईशी काय वैर?

कौशल चौधरीने लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी विकी मिद्दूखेड़ा याची हत्या करणाऱ्यांना शस्त्रे पुरवली होती. विक्की मिद्दूखेड़ाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लॉरेन्सने सिद्धू मूसवालाची हत्या केली. सिद्धू मूसवालाच्या हत्येनंतर कौशल चौधरीने लॉरेन्स बिश्नोईला उघडपणे धमकी दिली होती की, आता तो लॉरेन्स बिश्नोईलाही मारेल. याआधीही कौशल चौधरीने इंग्लंडमध्ये लॉरेन्स बिश्नोईचे चांगले संबंध असलेल्या व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार केला होता आणि घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्या पेटवून दिल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोईप्रमाणेच कौशल चौधरीकडेही शूटर्स, नेटवर्क आणि पैसा मोठ्या प्रमाणात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसjailतुरुंग