शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

गँगस्टर अबू सालेमच्या पुतण्याला अटक; उत्तर प्रदेश पोलिसांची वांद्रेत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 09:28 IST

आझमगढ पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, आरोपी हिना, तिचा पती सलाम आणि आरिफ यांनी शबाना परवीन यांची वडिलोपार्जित जमीन जबरदस्तीने हडप केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडपणे आणि खंडणी मागण्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात गँगस्टर अबू सालेमचा पुतण्या मोहम्मद आरिफ याला बेड्या ठोकल्या आहेत. वांद्रे परिसरातून ही कारवाई करण्यात आली आहे. 

आझमगढ पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, आरोपी हिना, तिचा पती सलाम आणि आरिफ यांनी शबाना परवीन यांची वडिलोपार्जित जमीन जबरदस्तीने हडप केली. तिघांनीही या मालमत्तेवर कब्जा करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली होती. तसेच तिघांनीही संगनमताने खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी परवीन यांच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरोधात  गुन्हा नोंदवत आरोपीचा शोध सुरू केला आहे. 

 आरिफ हा मुंबईतील वांद्रे परिसरात असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना मिळाली. त्यानुसार, उत्तर प्रदेश पोलिसांनी मुंबईत येऊन एक विशेष मोहीम राबवून वांद्रे येथील हिल रोड परिसरातून आरिफला ताब्यात घेतले. गँगस्टर अबू सालेम याचा मोठा भाऊ अब्दुल हकीम याचा आरिफ हा मुलगा आहे. या गुन्ह्यात आरिफला अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी उत्तर प्रदेशमध्ये आणल्याचे उत्तर प्रदेशचे विशेष पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :Abu Salemअबु सालेम