शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बँक खात्यांतून रक्कम काढणारी टोळी उजेडात; ४० हॅकर्स अनेक राज्यांमध्ये सक्रिय; एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 06:33 IST

Gangs withdrawing money from bank accounts : या टाेळीत कॉलिंग, रोख ट्रान्स्फर, विड्रॉलसाठी स्वतंत्र यंत्रणा काम करत असून, त्यापोटी त्यांना दोन ते पाच टक्के कमिशन दिले जात असल्याची बाब तपासात उघड झाली आहे.

- सुरेंद्र राऊत

यवतमाळ : बँक खाते हॅक करून परस्पर रोख रक्कम काढणाऱ्या ४० सदस्यीय आंतरराज्य टोळीचा दिग्रस पोलिसांनी पर्दाफाश केला असून, टोळीच्या प्रमुख सदस्याला बिहारमधून गजाआड करण्यात आले आहे. या टाेळीत कॉलिंग, रोख ट्रान्स्फर, विड्रॉलसाठी स्वतंत्र यंत्रणा काम करत असून, त्यापोटी त्यांना दोन ते पाच टक्के कमिशन दिले जात असल्याची बाब तपासात उघड झाली आहे.  विकासकुमार विनोदसिंह (रा. आजमपुरा, जि. नवादा, बिहार) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. त्याला त्याच्या मूळ गावातून दिग्रस पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्रसिंग बिलावत यांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून अडीच लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्याने २७ व २९ मे २०२० या दोन दिवसात ही रक्कम बँक खात्यातून काढली. याप्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अशा पद्धतीच्या २५ गुन्ह्यांची पडताळणी केली. औरंगाबाद, गडचिरोली, मुंबई, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक येथील फसवणूक झालेल्यांशी संपर्क करून गुन्ह्याची पद्धत जाणून घेतली. याप्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला असून, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा या राज्यांमध्ये या टोळीचे नेटवर्क आहे. संपूर्ण नेटवर्क पोलिसांच्या हाती लागू नये, म्हणून  कमिशन बेसिसवर टोळीतील प्रत्येकाला कॉलिंग ते विड्रॉलसाठी स्वतंत्र जबाबदारी दिली जात होती. 

असे चालते नेटवर्कझारखंडमधील जामतारा येथून केवळ कॉलिंग करण्यात येते. पश्चिम बंगालमधून केवळ सिम खरेदी केली जातात. मिळालेला पैसा ओडिशात विविध खात्यात ट्रान्स्फर केला जातो. नंतर तो बिहारमध्ये बँक खात्यातून काढला जातो. या पद्धतीमुळे आजपर्यंत हे पूर्ण नेटवर्क कधीच उघड झाले नाही. कॉलिंग होणाऱ्या जामताराचा पुढे सुगावा लागत नाही. 

गुन्ह्याची पद्धत बँक खातेधारकाच्या मोबाइल सिमकार्डचा ॲक्सेस घेतला जातो.   त्यानंतर काही वेळासाठी सिम बंद पाडले जाते. सिम ॲक्सेसच्या माध्यमातून बँक खाते ऑपरेट करत ओटीपी जनरेट करून पैसे काढून घेतले जातात. सिमकार्ड सुरू झाल्यानंतर ग्राहकाला मॅसेज येत नाही. त्यामुळे खात्यातून पैसे काढल्याचे लगेच लक्षात येत नाही.  

१ कोटी ३८ लाख उकळल्याची कबुली ऑनलाइन पद्धतीने  बँक खाते हॅक करून लॉकडाऊन काळात तब्बल १ कोटी ३८ लाख रुपये जमविल्याची कबुली आरोपीने दिली. खात्यात आलेली एवढी मोठी रक्कम पाहून प्राप्तीकर विभागाने या आरोपीला नोटीसही बजावल्याचे पुढे आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMONEYपैसाbankबँक