शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

धमकी देऊन ब्लॅकमेल करून युवतीवर सामूहिक बलात्कार , 7 आरोपींना अटक तर 3 जण फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 20:20 IST

Gangrape Case : तपास अधिकारी म्हणून महिला डीवायएसपींची नियुक्ती, आरोपींना वाचण्यासाठी स्वयंघोषित नेत्यांची धडपड

नरेश पवारवडखळ - पेण तालुक्यातील वाशी सरेभाग परिसरातील एका 17 वर्षीय युवतीला धमकी देऊन ब्लॅकमेल करून काही युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आल्याने पेण तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात युवतीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सात आरोपीना पोलिसांनीअटक केली आहे तर तीन आरोपीचा शोध सुरू आहे. या बाबत वडखळ पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत रजिस्टर नंबर 15/2022, 376 (ड) पोस्को कलम 376 ,4,8,7,12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या सात आरोपींना न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.    

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, पेण तालुक्यातील वाशी सरेभाग परिसरात राहणारी दहावीपर्यंत शिकलेली 17 वर्षीय युवती शेजारीच असलेल्या वाशी गावाच्या परिसरात एका हळदीसमारंभासाठी गेली होती सदर ठिकाणी या युवतीची ओळख दोन तरुणांसोबत झाली होती. या ओळखीचे रुपांतर काहीच दिवसात प्रेमात झाले. त्यातून त्या तरुणांनी तिचा गैरफायदा घेत तिच्यावर शारिरिक अत्याचार केले. त्यानंतर त्यांच्या मित्रांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनीही धमकावत त्या तरुणीवर अत्याचार केला. सदर नराधम या युवतीला धमकी देत दररोज आळीपाळीने तिच्यावर बलात्कार करीत होते. मागील अनेक महिन्यांपासून नराधमांनी तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणात सुमारे पंधरा हून अधिक जण सहभागी असल्याची चर्चा सुरू आहे. 

असे आले प्रकरण उघडकीस

 सदर  पीडित युवतीला हे नराधम लैंगिक शोषणा करिता वारंवार फोन करीत होते. आपल्या मुलीला वारंवार फोन येत असल्याने पीडित युवतीच्या पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर पीडित युवतीने  हे धक्कादायक वास्तव उघड केले.

 तपास अधिकारी म्हणून महिला डीवायएसपींची नियुक्ती 

या  प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने तपास होण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सोनाली कदम या उपविभागीय पोलिस अधिकारी यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. फरार आरोपींच्या शोधाकरिता पोलिसांनी एक पथक तयार केले आहे. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटक