शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

गँगरेप करून बनवलेले व्हिडीओ विकला ३०० रुपयांना; पाच अल्पवयीन मुलांनी केले दुष्कर्म 

By पूनम अपराज | Updated: February 2, 2021 17:25 IST

Gangrape : आरोपींनी धक्कादायक गुन्हा करून चित्रित केला आणि ऑनलाईन पोस्ट केला, जो पटकन व्हायरल झाला. तसेच तो व्हिडीओ ३०० रुपयांना विकला आहे. 

ठळक मुद्दे बडगावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) सिद्धार्थ वर्मा यांनी दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी रात्री एफआयआर दाखल केला आणि त्या तिघांनाही अटक केली.

महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत असताना आणखी एका गंभीर गुन्ह्याने उत्तर प्रदेशात खळबळ माजली आहे. पाच अल्पवयीन मुले आणि एका प्रौढ व्यक्तीने एका ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी धक्कादायक गुन्हा करून चित्रित केला आणि ऑनलाईन पोस्ट केला, जो पटकन व्हायरल झाला. तसेच तो व्हिडीओ ३०० रुपयांना विकला आहे.  या गुन्ह्यासंदर्भात सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पीडित पोलिसांकडे गेल्यानंतर गुरुवारी रात्री आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींपैकी पाच जण १५ ते १७ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुले आहेत. ते विधिसंघर्ष बालक आहेत. पाचही विधीसंघर्ष बालकांना बालगृहात पाठविण्यात आले आहे. सहावा आरोपी जो वयस्क आहे आणि त्याला तुरूंगात पाठविण्यात आले आहे."ही महिला आणि पाच मुले शेजारी राहणारे असून एकमेकांना ओळखतात. ऑक्टोबरमध्ये त्यांनी तिला एका शेतात नेले होते, जेथे मोबाईल फोनवर संपूर्ण घटना रेकॉर्ड करून त्यांनी तिच्यावर बलात्कार केला होता. त्यांनी तिला ही घटना कोणालाही सांगितल्यास सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने तिला शांत राहण्यास भाग पाडले. बुधवारी, १९ वर्षांच्या एका आरोपीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्या महिलेस त्याविषयी माहिती मिळाली. बडगावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) सिद्धार्थ वर्मा यांनी दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी रात्री एफआयआर दाखल केला आणि त्या तिघांनाही अटक केली.

माणुसकीला काळीमा! 15 वर्षीय मुलीवर सलग 5 महिने तब्बल 17 जणांनी केला बलात्कार

टीव्हीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, आरोपी परिसरातील लोकांमध्ये व्हिडिओ क्लिप्स प्रत्येकी 300 रुपयात विकत होते. या पाच विधी संघर्ष बालकांविरोधात कलम  376 डी (सामूहिक बलात्कार), ५०६  धमकी) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार (एससी / एसटी अ‍ॅक्ट) कलम नोंदविण्यात आले आहे. प्रौढ आरोपीवर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारPoliceपोलिसArrestअटकSocial Viralसोशल व्हायरलUttar Pradeshउत्तर प्रदेश