शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

मायलेकीवर गँगरेप! चालत्या कारमध्ये महिला आणि ६ वर्षांच्या मुलीची अब्रू लुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 20:10 IST

Gangrape Case : चिमुकलीवर ३ तास झाली शस्त्रक्रिया

रूड़की : चालत्या कारमध्ये एक महिला आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलीवर एका पुरुषाने आणि त्याच्या मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील रूड़की येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

महिलेने तिच्या मुलीला गंभीर अवस्थेत घेऊन पोलीस गाठले आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मुलीला गंभीर अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मुलीवर ३ तास डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. त्याचवेळी महिलेला सोबत घेऊन रात्रीच्या सुमारास कार चालकाचा शोध घेतला. जवळच बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले. दुसरीकडे, पोलिसांनी आईच्या तक्रारीवर सामूहिक बलात्कारासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, ती महिला तिच्या सहा वर्षांच्या मुलीसह रात्रीच्या वेळी पिरान कालियार या मुस्लिम धार्मिक स्थळावरून तिच्या घरी जात होती, तेव्हा सोनू नावाच्या व्यक्तीने तिला लिफ्ट देऊ केली. पोलिस अधीक्षक (ग्रामीण) प्रमेंद्र डोवाल यांनी सांगितले की, त्या व्यक्तीचे काही मित्र आधीच कारमध्ये होते. फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, सोनू आणि त्याच्या मित्रांनी महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर लिफ्ट देण्याचे आमिष दाखवून चालत्या कारमध्ये बलात्कार केला आणि कालव्याजवळ फेकून दिले.

 

पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलेने गाडीत नेमके किती पुरुष होते हे सांगू शकले नसले तरी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला इतरांनी सोनू म्हणून हाक मारल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी पुढे सांगितले की, महिला आणि तिच्या मुलीला रुडकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्यांच्या वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र, पोलीस आरोपींचा अद्याप शोध घेऊ शकले नाहीत.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसUttarakhandउत्तराखंड