शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
3
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
4
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
5
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
6
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
7
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
8
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
9
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
10
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
11
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
12
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
13
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
14
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

मर्सिडिज कारमध्ये अल्पवयीन मुलीवर गँगरेप; आरोपीमध्ये आमदाराच्या मुलाचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 13:07 IST

हैदराबाद - शहरात एका अल्पवयीन मुलीवर मर्सिडिज कारमध्ये गँगरेप झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. या आरोपींमध्ये हायप्रोफाइल नावांचा समावेश ...

हैदराबाद - शहरात एका अल्पवयीन मुलीवर मर्सिडिज कारमध्ये गँगरेप झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. या आरोपींमध्ये हायप्रोफाइल नावांचा समावेश आहे. सध्या यातील कुणालाही पोलिसांनी अटक केली नाही. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. हैदराबादच्या जुबली हिल्स याठिकाणच्या पॉश परिसरात ही घटना घडली आहे. ३-४ जणांनी मिळून पीडित तरूणीवर सामुहिक बलात्कार केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी १ अल्पवयीन आहे तर दुसऱ्या २ आरोपींमध्ये एक आमदाराचा मुलगा आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर पोलीस या घटनेचा तपास करत आहे. या प्रकरणात हायप्रोफाइल नाव असल्याने अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. बुधवारी जुबली हिल्स पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेची पुष्टी करत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. 

शनिवारी ही घटना घडली असून पोलिसांनी तपासानंतर आयपीसी कलम ३५४, ३२३, ९, १० आणि पॉस्को कायद्यातंर्गत ३ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. १७ वर्षीय पीडित तरूणीची मेडिकल तपासणी केल्यानंतर पोलिसांनी कलम ३७६ ही गुन्ह्यात दाखल केले. पीडित तरूणीला एका मित्राने पार्टीत बोलावले होते. सूत्रांनुसार, पार्टीत पीडित तरूणीसोबत आमदाराचा मुलगाही होता. पीडिता केवळ एका आरोपीची ओळख पटवू शकली. हा आरोपी अल्पवयीन आहे. 

पीडित युवतीच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटलंय की, २८ मे रोजी त्यांची मुलगी एका पार्टीत गेली होती. तिचा मित्र सूरज आणि हादीने पार्टीचे आयोजन केले होते ज्यात तिला बोलवण्यात आले होते. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास लाल रंगाच्या मर्सिडिज कारमध्ये काही लोकांसोबत पब म्हणून बाहेर पडली. त्यावेळी एक इनोव्हा कारही बाहेर पडली. कारमध्ये असणाऱ्यांनी माझ्या मुलीवर अत्याचार केले. तेव्हा माझ्या मुलीला धक्का बसला आहे. या घटनेची खुलासा करण्यात ती असमर्थ आहे. त्यामुळे पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करून पीडित तरूणीला न्याय द्यावा अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे.