उल्हासनगरात टोळक्यांची दहशद; १० गाड्यांची तोडफोड, ५ जणांना अटक, परिसरात भीतीचे वातावरण
By सदानंद नाईक | Updated: July 23, 2022 17:36 IST2022-07-23T17:35:42+5:302022-07-23T17:36:43+5:30
Ulhasnagar : शुक्रवारी मध्यरात्री काही जणांच्या टोळक्याने हनुमाननगर परिसरात धिंगाणा घालून रिक्षा, मोटरसायकल आदी १० पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड केली.

उल्हासनगरात टोळक्यांची दहशद; १० गाड्यांची तोडफोड, ५ जणांना अटक, परिसरात भीतीचे वातावरण
उल्हासनगर : कॅम्प नं-२ हनुमाननगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एका टोळक्याने धिंगाणा घालत १० पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून त्यापैकी ३ जण अल्पवयीन असल्याने, त्यांची भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-२ रमाबाई आंबेडकरनगर, भैय्यासाहेब आंबेडकरनगर, डम्पिंग परिसर व टेकडी परिसरात लहान-मोठया टोळ्या कार्यरत झाल्या असून त्यांच्यातील हाणामारी नेहमीची झाली. अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. त्यांना पोलिसांची भीती राहिली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. शुक्रवारी मध्यरात्री काही जणांच्या टोळक्याने हनुमाननगर परिसरात धिंगाणा घालून रिक्षा, मोटरसायकल आदी १० पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड केली. या प्रकाराने भयभीत झालेल्या नागरिकांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन मध्यरात्री झालेल्या प्रकारची माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे ५ जणांना अटक केली. त्यापैकी ३ जण अल्पवयीन असल्याने, त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी केली. तर इतरांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली.
कॅम्प नं-२ परिसरात टोळक्यांकडून हाणामारी व वाहनांची तोडफोड वारंवार होत असल्याने, नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी पंजाबी कॉलनी सुभाषनगर परिसरात अश्याच प्रकारे टोळक्याकडून वाहनांची तोडफोड झाली होती. शहरात पोलिसांचा धाक न राहिल्याने, अश्या घटनेत वाढ झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. बार मध्ये छमछम वाढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच जुगार, मटका, लॉटरी जुगार, गावठी दारूचे अड्डे शहरात जागोजागी झाल्याने, गुन्हेगारीच्या घटनेत वाढ झाल्याचा आरोप होत आहे. शहर पोलिसांना गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी मोठी कारवाई करणे अपेक्षित असल्याचे बोलले जाते.