शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 13:42 IST

Crime News : या घटनेतील पीडित तरुणी ही कल्याणला राहणारी असून ती अंबरनाथमध्ये एका दुकानात काम करते. ति

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने तपासाची सुत्रे फिरवत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अंबरनाथच्या जीआयपी डॅम परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास ही सामूहिक बलात्काराची घटना घडली. 

या घटनेतील पीडित तरुणी ही कल्याणला राहणारी असून ती अंबरनाथमध्ये एका दुकानात काम करते. तिचा मित्र हनुमान हिलम हा रविवारी त्याचे मित्र विश्वास मढवी आणि जावेद अन्सारी यांच्यासोबत जीआयपी डॅम परिसरात दारू पिण्यासाठी बसला होता. याचदरम्यान हनुमान याने पीडित तरुणीला फोन करून जीआयपी डॅम परिसरात बोलावून घेतले. तिला आणण्यासाठी हनुमान याने मित्राची रिक्षा देखील पाठवली. तिला समोर बसवून तिघा मित्रांनी दारू पीत तिला घाबरवण्यास सुरुवात केली. 

एवढेच नव्हे तर बिअरची बाटली फोडून, त्या बाटलीने तिला भोसकण्याची धमकी देत तिचा शारीरिक छळ केला. यानंतर हनुमान याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. यानंतर त्याचे मित्र विश्वास आणि जावेद यांनीही तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर हादरलेल्या तरुणीने थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार केली. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करत या तिघांना तातडीने शोधून काढले आणि बेड्या ठोकल्या आहेत.   पीडित मुलीवर तिच्या जवळ तिच्या मित्रांनी बलात्कार केल्याची तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे.  - मधुकर भोगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी