शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरुन पायी घरी जाणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; मुंबईला हादरुन टाकणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 13:07 IST

सदर घटनेची माहिती पीडितेने पोलिसांना फोनवरून दिली.

मुंबई: गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात ओळखीच्यानीच तरुणीचा घात करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना शनिवारी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आज आणखी दोन जणांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती शिवाजी नगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलिसी निरिक्षक यांनी दिली.

पीडित तरुणी ही केटर्समध्ये काम करते. २१ जानेवारी रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास जुना बस डेपो मट्टी रोडवरून पायी घरी जात होती. त्याचवेळी तिच्या ओळखीचे चार तरुण तिला दिसले. त्यातील एकाने ही कुठून आली, अशी विचारणा केल्यावर कामावरून परतत असल्याचे उत्तर तिने दिले. त्यावर दुसऱ्याने तिला तुझ्याशी बोलायचे आहे, माझ्यासोबत चल असे सांगत तिला जवळच्या झोपडीच्या पोटमाळ्यावर नेले. त्याच्या पाठोपाठ अन्य तरुणही तिथे आले आणि त्यांनी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. ते पाहून तिने आरडाओरडा केल्याने तिचे तोंड दाबत चौघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला आणि घटनास्थळाहून पळ काढला होता.

तातडीने पथके रेल्वेस्थानकावर रवाना

सदर घटनेची माहिती पीडितेने पोलिसांना फोनवरून दिली. ती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मस्के, सहायक पोलीस निरीक्षक देवडीकर यांच्या नेतृत्वाखाली दहा जणांच्या पथकांची नियुक्ती करत सीएसएमटी, एल टी मार्ग, मुंबई सेंट्रल सारख्या रेल्वे स्थानकावर पथके रवाना केली.

तपास करताना उत्तर प्रदेशातील बस्ती येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज पुन्हा दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिरीष इडेकर या तपास करत आहेत. पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस