शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; आरोपींमध्ये आमदाराचा मुलगा असल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 07:30 IST

पीडित मुलीच्या वडिलांनी सामूहिक बलात्कारप्रकरणी १ जून रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली.

हैदराबाद : एका हायप्रोफाइल पार्टीला गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. ११ वी, १२ वी इयत्तेत शिकणाऱ्या पाच अल्पवयीन मुलांनी एका मर्सिडीज गाडीमध्ये हे गैरकृत्य केले. याप्रकरणी एका आराेपला अटक करण्यात आली असून इतर आराेपींची ओळख पटविण्यात आली आहे. या आरोपींमध्ये एक आमदारव आणखी एक राजकीय नेता यांची मुले असल्याचे सांगण्यात आले. 

 २८ मे रोजी ही घटना घडली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी सामूहिक बलात्कारप्रकरणी १ जून रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेचे कलम ३५४ व पॉक्सो कायद्यान्वये याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींपैकी अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही. २८ मे रोजी पीडित मुलगी एका हायप्रोफाइल पार्टीसाठी एका पबमध्ये गेली होती. तिथून ती सायंकाळी साडेपाच वाजता घरी यायला निघाली. 

आम्ही तुला घरी सोडू, असे पबमध्ये भेटलेल्या काही मुलांनी तिला सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून ती या मुलांच्या मर्सिडीज गाडीमध्ये बसली. त्या गाडीत पाच मुले व ही मुलगी, असे सहाजण बसले होते. या मुलांनी कार अंधाराच्या ठिकाणी नेली.  कारमध्ये मुलीला बेदम मारहाण केली व तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलीच्या अंगावर अनेक जखमा आहेत. बलात्काराच्या घटनेने मुलीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. आरोपींवर अतिशय कडक कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.  दरम्यान पबबाहेरील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची तपासणी सुरू केली आहे  (वृत्तसंस्था)

पबमधील पार्टी मद्याविना असल्याचा दावा

पबमध्ये झालेल्या पार्टीत मद्याचा समावेश नव्हता, असा दावा त्या पबच्या मालकाने केला आहे. पबमधील पार्टीचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बलात्कार करणाऱ्या मुलांपैकी एकाची पीडित मुलीने ओळख पटविली होती. या आरोपींमध्ये एका आमदाराचा मुलगाही सामील असल्याची चर्चा आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.   

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिस