शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, प्रियकरासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 08:49 IST

धर्मवीरनगरमध्ये राहणारा आरोपी आकाश याची आणि पीडित मुलगी यांची गेल्या एक वर्षभरापूर्वी ओळख झाली. याच ओळखीतून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

 ठाणे : एका १६ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आकाश कदम (वय २१) याच्यासह तिघांना वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. या तिघांनाही १९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. पीडित मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे.धर्मवीरनगरमध्ये राहणारा आरोपी आकाश याची आणि पीडित मुलगी यांची गेल्या एक वर्षभरापूर्वी ओळख झाली. याच ओळखीतून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून १२ ते १३ नोव्हेंबर २०२० रोजी त्याच्या घरी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. नंतर तिच्या घरात हा प्रकार कोणाला समजू नये, यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने आकाशचा मित्र विकी ऊर्फ विकास करोतिया (वय २१), तसेच विकीचा मित्र सागर करोतिया (२६) यांनीही आकाशच्या घराजवळील परिसरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.यातूनच ती चार महिन्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला. त्यावेळी तिने आईला ही आपबिती सांगितली. कुटुंबीय रागावतील या भीतीने आपण हा प्रकार सांगितला नसल्याचेही तिने सांगितले. मुलीच्या आईने तातडीने याप्रकरणी १२ मे २०२१ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर आणि सहायक पोलीस निरीक्षक शीतल चव्हाण यांच्या पथकाने आकाश याच्यासह तिघांनाही अटक केली. 

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिस