मुंबई - नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत दोघा नराधमांनी एका तरुणीवर सामुहिक बलात्कार करण्याचा खळबळजनक प्रकार नुकताच गोवंडीत घडला आहे. अत्याचार करणाऱ्या दोघा नराधमांना ट्रॉम्बे पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली. अमजदअली मोहम्मदजमा खान (वय ३०) व नूर मोहम्मद नजीर शेख (४२, दोघे रा. म्हाडा कॉलनी,गोवंडी) अशी त्यांची नावे आहे.खान हा पेंटर तर शेख हा वाहन चालकाचे काम करतात. परिसरात रहात असलेल्या एका तरुणीशी खान याने लग्नाचे आमिष दाखवून जवळीक निर्माण केली होती. तिचे नग्न अवस्थेतील फोटो मागवून घेतले होते. त्यानंतर तो तिला ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देवू लागला. तिला सहा सप्टेंबरला मानखुर्दमधील महाराष्ट्र नगरातील शांती को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील रुम नं.११५ मध्ये बोलाविले. सायंकाळी साडे सातच्या सुमारास खान व शेख यांनी तिच्यावर बलात्कार केला. तिने घडलेल्या प्रकाराबाबत शनिवारी पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिली. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर दोघेजण फरारी झाले होते. सोमवारी रात्री खान व शेखला अटक केली. त्यांच्यावर सामुहिक बलात्कार व माहिती तंत्रज्ञान कायदा २०००कलम ६७अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
गोवंडीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 20:49 IST
फोटो व्हायरल करण्याचे धमकावून अत्याचार
गोवंडीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; दोघांना अटक
ठळक मुद्देअत्याचार करणाऱ्या दोघा नराधमांना ट्रॉम्बे पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली. सायंकाळी साडे सातच्या सुमारास खान व शेख यांनी तिच्यावर बलात्कार केला.