शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

सामूहिक बलात्कार प्रकरण: आरोपींना ३० तासांत ठोकल्या बेड्या, मोबाइल लोकेशनमुळे लागला छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 09:21 IST

Thakurli Gang rape case:  पोलिस असल्याची बतावणी करीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या ठाकुर्ली खाडी किनारी शुक्रवारी घडलेल्या गुन्ह्यातील दोघा आरोपींना पोलिसांनी ३० तासांच्या आत बेड्या ठोकल्या.

डोंबिवली :  पोलिस असल्याची बतावणी करीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या ठाकुर्ली खाडी किनारी शुक्रवारी घडलेल्या गुन्ह्यातील दोघा आरोपींना पोलिसांनी ३० तासांच्या आत बेड्या ठोकल्या. विष्णू सुभाष भांडेकर (वय २५, रा. नेवाळी नाका) आणि आशिष गुप्ता (वय ३२, रा. दत्त चौक नांदिवली रोड, डोंबिवली), अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपींच्या शोधासाठी पाच तपास पथके तयार केली होती. आरोपी हे नेहमीच खाडी किनारा परिसरात जात होते. त्यांनी अशा पद्धतीने आणखी काही मुली, महिलांना लक्ष्य केले आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत. यातील विष्णू हा घरफोडीतील सराईत गुन्हेगार असून, अलीकडेच तो जामिनावर सुटला होता. आशिष हा चहा टपरीवर काम करतो. शुक्रवारी दुपारी अल्पवयीन मुलगी आणि तिचा मित्र ठाकुर्ली पश्चिमेत रेल्वे स्थानकालगतच्या खाडीकिनारी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी हे दोघे तरुण पीडित मुलगीकडे गेले. आम्ही पोलिस आहोत, असे सांगत त्यांना घाबरवले. तुमच्याबद्दल तुमच्या पालकांना सांगणार, असेही धमकाविले. पीडितेच्या मित्राला घटनास्थळापासून दूर नेत दोन्ही नराधमांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी त्याचे मोबाइल कॅमेरात चित्रीकरण केले. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर आम्ही तुझी समाजमाध्यमांवर बदनामी करू, अशी धमकी दिली होती. 

मोबाइलवरून पटली ओळखआरोपींनी बलात्कार करताना मोबाइलमध्ये चित्रण केले होते. मोबाइल ज्या कंपनीचा होता त्याची माहिती पीडितेने पोलिसांना दिली होती. त्यावरून घटनेच्या वेळी त्या परिसरात संबंधित कंपनीचे किती फोन ॲक्टीव होते, याची माहिती मिळविण्यात आली. त्याआधारे आरोपीपर्यंत पोहोचले.

निर्जनस्थळ टाळा निर्जनस्थळी काही अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे अशा निर्जनस्थळी जाणे टाळावे, असे आवाहन सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी नागरिकांना केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण