शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

ऑनलाइन ऑर्डर लंपास करणारी टोळी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 08:37 IST

लॅपटाॅपसह ९३ हजारांचा ऐवज जप्त : तिघे अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग कंपनीच्या माध्यमातून खोटे पत्ते देऊन कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायाने बुकिंग केलेली पार्सल घेताना बिलापेक्षा कमी रक्कम मोजण्यासाठी देऊन पार्सलमधील किमती वस्तूंचा परस्पर अपहार करणाऱ्या नगऱ्या उर्फ किरण अमृत बनसोडे (२५, रा. मलंगगडरोड, कल्याण) याच्यासह तिघांना कासारवडवली पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी गुरुवारी दिली. त्यांच्याकडून लॅपटॉपसह ९३ हजार ३९९ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 

 ई-कार्ट लॉजिस्टिक प्रा. लिमिटेड कंपनीचा डिलेव्हरी बॉय फ्लिपकार्ट कंपनीकडून ऑर्डर केलेली ४४ हजार ९०० रुपयांची घड्याळे घेऊन घोडबंदर रोड येथील एका रहिवाशाकडे ३० डिसेंबर रोजी सकाळी ९.२० वाजण्याच्या सुमारास गेला होता.  तेव्हा शिपमेंटच्या वस्तूंपेक्षा कमी पैसे असल्याचा बहाणा करून, त्यांना पैसे मोजण्यामध्ये गुंतवून डिलिव्हरीचे पार्सल या कर्मचाऱ्याने दूर नेले. नंतर त्यातील ४४ हजारांचे नामांकित कंपनीचे घड्याळ काढून घेतले. त्याऐवजी साबणाच्या वड्या दिल्या. याबाबत ब्रह्मांड येथील ई-कार्ट लॉजिस्टिकचे कर्मचारी अविनाश वाकळे (२७, ठाणे ) यांनी ३१ डिसेंबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन सरडे यांच्या पथकाने  गोपनीय माहितीच्या आधारे ऑनलाइन पार्सल मागवून डिलिव्हरीबॉयची फसवणूक करणाऱ्या  बनसोडेसह दीपक चौधरी उर्फ अतुल वर्मा उर्फ  मनजित सिंग (२२, रा.  डोंबिवली) आणि  रॉबिन ॲन्थोनी अरुजा (२६, डोंबिवली) या तिघांना १ जानेवारी रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून  गुन्ह्यातील मोबाइल फोनसह फवणुकीतील ४४ हजार ९००  चे घड्याळ, दोन मोबाइल आणि लॅपटॉप असा ऐवज हस्तगत केला. 

अनेक ठिकाणी फसवणूकहे तिघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांनी यापूर्वी डोंबिवली, ठाणे मुंबई, नवी मुंबई, अलिबाग, सातारा, गणपती पुळे,  केरळ, गुजरात, विशाखापटणम, मध्य प्रदेश या ठिकाणी अशाप्रकारे फसवणुकीचे प्रकार केल्याचेही पोलिसांनी सांगितले.

दोन काेटींचा ऐवज वाचलाया ठकसेनांनी अशाप्रकारे आणखी सहा महागड्या मोबाइलच्या ऑर्डर कासारवडवली आणि हिरानंदानी परिसरामध्ये दिल्या होत्या. त्यांच्या अटकेमुळे पुढील गुन्हे त्यांना करता आले नाही. त्यामुळे कंपनीचे सुमारे दोन कोटी सात लाख ३९६ रुपयांचे नुकसान वाचविण्यात यश आले आहे.

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्ट