शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

जुन्या तारखांचे स्टॅम्प पेपर विकणारी टोळी गजाआड; ४७ स्टॅम्प पेपर जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 19:51 IST

Crime News : पोलिसांच्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही स्टॅम्प वेंडर त्यांच्या दलालाच्या माध्यमातून जुन्या तारखांचे स्टॅम्प पेपर विकत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.

ठळक मुद्देबिना यशवंत आडवाणी (वय ६०, रा. उत्कर्ष नगर, वलय अपार्टमेंट, धरमपेठ), भीमाताई राजू वानखेडे (वय ५३, रा. भिलगाव), आशिष गुलाबराव शेंडे (वय २७,रा. सुभाषनगर, अंबाझरी) आणि हिमांशू धीरज सहारे (वय २०, रा. खलासी लाईन, सदर) अशी त्यांची नावे आहेत. 

नागपूर : जुन्या तारखांचे स्टॅम्प पेपर विकणाऱ्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी छडा लावला. या टोळीतील दोन महिलांसह चौघांना पोलिसांनीअटक केली. बिना यशवंत आडवाणी (वय ६०, रा. उत्कर्ष नगर, वलय अपार्टमेंट, धरमपेठ), भीमाताई राजू वानखेडे (वय ५३, रा. भिलगाव), आशिष गुलाबराव शेंडे (वय २७,रा. सुभाषनगर, अंबाझरी) आणि हिमांशू धीरज सहारे (वय २०, रा. खलासी लाईन, सदर) अशी त्यांची नावे आहेत. 

पोलिसांच्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही स्टॅम्प वेंडर त्यांच्या दलालाच्या माध्यमातून जुन्या तारखांचे स्टॅम्प पेपर विकत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. शहानिशा केल्यानंतर दलालाच्या माध्यमातून पोलिसांनी स्टॅम्प वेंडर बिना अडवाणी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून दोन महिन्यापूर्वीचा तारखेचा स्टॅम्प पेपर सोमवारी विकत घेतला. १०० रुपयाचा स्टॅम्प पेपर १००० रुपये किमतीत अडवाणी यांनी पोलिसांच्या पंटरला दिला. त्याच वेळी त्यांना आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या उपरोक्त तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यानंतर अडवाणी यांच्या धरमपेठमधील निवासस्थानी छापा घालण्यात आला. पोलिसांनी तेथे झडती घेतली असता जुन्या तारखांचे ४७ कोरे स्टॅम पेपर त्यांच्याकडे आढळले. त्यांच्याकडे असलेल्या नोंदवहीत एकाच नावाने स्टॅम्प पेपर विक्री केल्याच्या खोट्या नोंदी पोलिसांना आढळून आल्या.  त्यामुळे अडवाणी, वानखेडे, शेंडे आणि सहारे या चौघांना पोलिसांनी कलम १६७,  ४६७, ४६८ अन्वये अटक केली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करून त्यांचा २८ मे पर्यंत पीसीआर मिळविण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, उपनिरीक्षक लक्ष्मीछाया तांबूसकर, पी. एम. मोहेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.गुन्हेगार, भूमाफियांकडून वापर जुन्या तारखांच्या स्टॅम्प पेपरचा गैरवापर ठिकठिकाणचे भूमाफिया, गुन्हेगार आणि अवैध सावकार मोठ्या प्रमाणात करतात. जमिनी, दुकान आणि अशीच मालमत्ता बळकावण्यासाठी तसेच शासन, प्रशासनाची दिशाभूल करून सर्वसामान्यांची फसवणूक करण्यासाठी जुन्या तारखांच्या स्टॅम्प पेपरचा गैरवापर केला जातो. त्यावर संबंधित मालमत्ता धारकांच्या सह्या घेऊन जुन्या तारखेमध्ये अभिलेख लिहून घेतला जातो. जुन्या स्टॅम्प पेपरची मागणी गुन्हेगारी षड्यंत्र रचणार्‍याकडून नियमित केली जाते. या प्रकरणाशी संबंधित कुणी गुन्हेगार आणि भूमाफिया आहेत काय, त्याचाही आता पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :ArrestअटकnagpurनागपूरPoliceपोलिस