शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

सराईत चोरट्यांची टोळी नाया नगर पोलिसांनी पकडली ; ६ गुन्हे उघडकीस

By धीरज परब | Updated: July 25, 2022 20:42 IST

Crime News : मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाणे हद्दीत २१ ते २२ जुलै ह्या दोन दिवसात ४ दुचाकी व १ जबरी चोरीचे गुन्हे घडल्याने खळबळ उडाली होती.

मीरारोड - मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी दुचाकी . मोबाईल चोरण्यासह जबरी चोरी करणाऱ्या ३ जणांच्या टोळीला अटक केली असून त्यांच्या कडून ४ दुचाकी जप्त केल्या आहेत . तर सदर टोळीने केलेले ६ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. 

मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाणे हद्दीत २१ ते २२ जुलै ह्या दोन दिवसात ४ दुचाकी व १ जबरी चोरीचे गुन्हे घडल्याने खळबळ उडाली होती. पोलीस उपायुक्त अमित काळे व सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सहायक निरीक्षक प्रणय काटे व पराग भाट यांच्या अधिपत्या खाली हापसे, गुरव, बागवान, विकास यादव, वारके, कांबळे व खामगळ यांची २ स्वतंत्र पथके नेमली होती. 

अश्या प्रकारे चोऱ्या करणाऱ्या आरोपींचा मागोवा घेतानाच दुसरीकडे गुन्हे घडलेल्या परिसरातील तांत्रिक पुरावे , सीसीटीव्ही  तसेच खबऱ्यां मार्फत माहिती गोळा करत तपास चालवला होता . पोलीस पथके तपास करत असताना चोरीच्या गुन्ह्यातील एक दुचाकी भाईंदर पश्चिमेच्या भोला नगर झोपडपट्टी भागात आढळून आली . पोलिसांनी सापळा रचला असता ती चोरीची दुचाकी घेण्यासाठी ३ जण आले . परंतु पोलिसांच्या सापळ्याची चाहूल लागल्याने ती पळून जाऊ लागले असताना त्यांना पकडण्यात आले . 

पकडण्यात आलेल्या ३ आरोपींपैकी १ विधीसंघर्षग्रस्त बालक आहे . त्यांच्या कडे कसून तपास केल्यावर त्यांनी नयानगर पोलीस ठाणे हद्दीतून ४ दुचाकी चोरल्याचे व १ जबरी चोरी केल्याचे तसेच भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दी १ मोबाईल चोरल्याची कबुली दिली आहे . आरोपीं कडून चोरलेल्या ४ दुचाकी व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आल्या असून  ६ गुन्हे त्यांनी केल्याचे उघड झाले आहे . 

 

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकmira roadमीरा रोडbikeबाईक