शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

सोन्याची नाणी कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून लुटणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 21:21 IST

Khamgaon Crime News : पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सोन्याची नाणी कमी किंमतीत देण्याचे आमीष दाखवून लुटणाºया दुसºया एका टोळीला खामगाव पोलिसांनी जेरबंद केले. चाकूचा धाक दाखवून लुटणाºया टोळीतील एकाने नकळत दूरध्वनी केल्यानंतर संबंधिताने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दधम, जयरामगड येथील दुसºयाटोळीचे बिंग फुटले. पोलिसांनी सतर्कतेने कोंबीग आॅपरेशन राबवून पाच जणांना अटक केली.सोन्याची नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष दाखवून टोळीतील काहींनी फिर्यादी हनुमान महादेव गिरी (२४) रा. माळशेलू जि. हिंगोली आणि त्याचा मित्राला २९ मे रोजी बोलाविले. शीर्ला येथील राधास्वामी संत्सगाजवळ फिर्यादी पोहोचल्यांनतर तेथे आधीच सापळा रचून बसलेल्या १० ते १२ जणांनी फिर्यादी जवळील २५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. त्यानंतर या टोळीतील काहींनी संबंधिताच्या दूरध्वनीवर संपर्क करीत, ३ ते ४ रुपये घेऊन नकली सोन्याच्या नाण्याचे आमिष देत बोलाविले. त्यावेळी फिर्यादीने पोलिसांनी संपर्क केला. त्यानंतर अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या नेतृत्वात ६४ अधिकाºयांनी दधम, हिवरखेड परिसरात कोंबींग आॅपरेशन राबविले. जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर, पोलिस निरिक्षक संतोष ताले, ठाणेदार प्रविण तळी, गोकुळ सूर्यवंशी, सपोनिी गोंदके, सपोनि गौतम इंगळे, सपोनि निलेश सरदार, पोउपनि गौरव सराग, पोउपनि राहुल कातकाडे, पोउपनि ईश्वर सोळंके, पोउपनि पळसपगार, नितिन इंगाहे, ब्राम्हणे, हरिविजय बोबडे यांनी ही कारवाई केली.

 

पाच आरोपी अटकेत- महेश बाळू मोहिते (२३), दिलीप शेषराव चव्हाण (२३), कृष्णा पुंडलिक चव्हाण (६०), बळीराम पुंडलिक चव्हाण(४५) सर्व रा. दधम आणि सतिश पवन पवार (१९) रा. जयरामगड यास अटक केली. दरम्यान, २९ मे रोजीच्या घटनेत याप्रकरणी भादंवि कलम ३९५, ३९७ अन्वये हिवरखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात दुर्जन किसन शिंदे रा. जयरामगड यास अटक करण्यात आली होती.

मोटारसायकलीसह ९० हजारा मुद्देमाल जप्त- पोलिसांनी सोमवारी राबविलेल्या कोंबींग आॅपरेशनमध्ये एक तलवार, एक सुरा, दोन चाकू, एक लाकडी दांडा, एक मोबाईल तसेच  एम एच २८ बीडी- ८८४५ या क्रमांकाची दुचाकी असा एकुण ९० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी